Cave | Image Used For Representational purpose Only (Photo Credits: Pixabay.com)

सर्बिया (Serbia News) येथील गुहेत राहणाऱ्या एका संन्याशाला कोरोना व्हायरस (Coronavirus Pandemic) संसर्ग झाल्याचे पुढे आले आहे. विशेष म्हणजे या संन्याशाला `सोशल डिस्टन्सींग किंग` (Social Distancing King) म्हणूनही ओळखले जाते. सांगितले जाते की, हा संन्याशी पाठिमागील 20 वर्षांपासून गुहेत राहतो. पेंटा पेट्रोविक (Panta Petrovic) असे या संन्याशाचे नाव आहे. हा संन्याशी परतल्यावर त्याची कोरोना व्हायरस चाचणी करण्यात आली. ही चाचणी पॉझिव्ह आली. गुहेतील संन्याशालाही कोरोना झाल्याचे पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. दरम्यान, या संन्याशाने स्वत:ला कोरोना लस (Covid 19 Vaccine) टोचून घेतली.

पेंटा पेट्रोविक (Panta Petrovic) 20 वर्षांपूर्वी गुहेत गेला होता. जेव्हा तो परत आला तेव्हा सर्व लोकांनी तोंडाला मास्क लावल्याचे पाहून भलताच चकीत झाला. सांगितले जाते की, पेट्रोविक याला मनुष्य प्रजातीबद्दलच राग निर्माण झाला. त्यामुळे त्याने या सर्वांपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला. पाठिमागील 20 वर्षांपासून तो गुहेत राहू लागला. त्यामुळे त्याला सोशल डिस्टन्सींग किंग म्हणून ओळखले जाऊ लागले. (हेही वाचा, नरेंद्र मोदी यांनी ध्यानधारणा केलेल्या केदारनाथ गुहेला भाविकांची जोरदार मागणी, प्रशासन उभारणार आणखी एक गुहा)

पेंटा पेट्रोविक हा पुन्हा जेव्हा शहरात आला तेव्हा त्याने लोकांना तोंडाला मास्क लावताना पाहिले. हे दृश्य त्याच्यासाठी प्रचंड धक्कादायक होते. लोकांशी बोलल्यानंतर त्याला कोरोना व्हायरस संसर्गाबाबत माहिती कळली. तेव्हा आश्चर्याने तो म्हणाला की, जेव्हा मी गुहेत गेलो होतो तेंव्हा जग चांगल्या स्थितीत होते. अचानक हे काय होऊन बसले.

दरम्यान, महत्त्वाचे असे की, आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक आहेत ज्यांनी अद्यापही कोरोना लस घेतली नाही. मात्र, 20 वर्षे गुहेत राहणाऱ्या पेंटा पेट्रोविक (Panta Petrovic) यांनी मात्र कोरोनाबाबत माहिती मिळताच प्रतिबंधात्मक उपाय म्हणून कोरोना लस घेतली आहे. त्याने इतर लोकांनीही कोरोनाची लस घ्यावी असा सल्ला दिला आहे.