मानवी वर्तनाचा अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांनी अलिकडेच शधून काढले आहे की, सोशल मीडियावरील "सॅडफिशिंग" (Sadfishing) आणि चिंताग्रस्त (Anxious Attachment) जीवनशैली यांचा अत्यंत घनिष्ठ संबंध आहे. "सॅडफिशिंग" ची व्याख्या "सोशल मीडिया वापरकर्त्यांची सहानुभूती निर्माण करण्यासाठी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची अतिशयोक्ती प्रकाशित करण्याची प्रवृत्ती" अशी करण्यात आली आहे. संशोधकांनी असे शोधून काढले की ज्या व्यक्ती सॅडफिशिंगमध्ये गुंतलेल्या असतात त्यांच्यात अनेकदा चिंताग्रस्त आसक्तीची लक्षणे दिसून येतात. ही एक प्रकारची अशी मनस्थिती आहे, ज्याला सातत्याने इतरांकडून मान्यता मिळविण्याची गरज असते. त्याला त्याची लोकप्रियता सोडून जाण्याची भीती असते. अभ्यासात आढळून आले आहे की, सॅडफिशिंग हे कमी काळासाठी किंवा काही प्रमाणात अधिक काळासाठी असू शकते आणि सामान्यीकृत चिंता विकार दर्शवू शकते.
सॅडफिशींग हे प्रकरण नवे नाही. ते पूर्वीपासून आहे. मात्र, असे असले तरी तज्ञांनी नोंदवले की सॅडफिशिंगची समस्या सोशल मीडियाने अधिक वाढविली आहे. पीएचडी, लॉस एंजेलिसमधील न्यूपोर्ट हेल्थकेअरमधील हेल्दी डिव्हाइस व्यवस्थापनासाठी राष्ट्रीय सल्लागार म्हणून काम करणाऱ्या डॉन ग्रँट यांनी फॉक्स न्यूज डिजिटलला सांगितले की हा ट्रेंड काही नवीन नाही. ग्रँट, एक पुरस्कार-विजेता मीडिया मानसशास्त्रज्ञ आणि संशोधक आहेत. त्यांनी निदर्शनास आणले की, केंडल जेनरच्या प्रोएक्टिव्ह सोबतच्या 2019 च्या मोहिमेद्वारे सॅडफिशिंगने राष्ट्रीय लक्ष वेधून घेतले, जिथे तिने मुरुमांच्या तिच्या संघर्षाबद्दल सांगितले.
प्रो. ग्रँटने पुढे स्पष्ट केले की, सॅडफीशिंगमध्ये असलेला व्यक्ती सोशल मीडिया पोस्टमागील प्रेरणा हायलाइट करण्यासाठी चिंतनशील प्रश्न विचारतो तो सातत्याने, माझ्या जवळच्या मित्रांना माझ्यासोबत काय चालले आहे हे माहित आहे. माझे दैनंदिन जीवन काय आहे हे त्यांना माहीत आहे,सांगत राहतो. प्रो. ग्रँट पुढे म्हणाले की, तुम्ही सोशल मीडियावर काहीही टाकत असाल, तर तुमची गरज काय आहे किंवा तुमच्या जवळच्या वर्तुळात नसलेल्या लोकांना जाणून घ्यायची इच्छा आहे काय? पोस्ट करण्याचे तुमचे कारण काय आहे? संपूर्ण जगाला पाहण्यासाठी काहीतरी पोस्ट करण्याची तुमची प्रेरणा काय आहे? याबाबत विचार करणे गरजेचे आहे. पण, सॅडफिशींगमधील व्यक्ती तो विचार करत नाही.
वाचकांच्या माहितीसाठी असे की, सॅडफिशिंग हा शब्द लेखक रेबेका रीड यांनी तयार केला आहे. सॅडफिशिंगचा अर्थ असा की, सोशल मीडया वापरकर्ता लोकांची सहानुभुती मिळविण्यासाठी ऑनलाईन पोस्ट लिहून अनुभव कथन करतो. बहुतांशवेळा त्या त्याच्या कल्पनेतून आलेल्या असतात तर काही वेळा अनुभवातून. पण, अनुभवातून आलेल्या बाबी फारच क्षुल्लक असतात तरीदेखील तो त्या ऑनलाईन माध्यमातून रंगवून सांगत असतो. त्याला सातत्याने लोकांनी सहानुभूती द्यावे असे वाटत राहते.