उत्तर अमेरिकेतील मेक्सिकोमध्ये एका अज्ञात बंदूकधारी व्यक्तीने गोळीबार केला आहे. या घटनेत 10 जणांचा मृत्यू झाला आहे तर नऊ जण जखमी आहेत. मेक्सिकोच्या बाहा कालिफोर्निया (Baja California) ही घटना घडली आहे. अमेरिकेच्या कॅलिफोर्नियाजवळ असलेले हा परिसर अंमली पदार्थांच्या तस्करीसाठी ओळखला जातो. बाजा कॅलिफोर्निया राज्य ऍटर्नी जनरलच्या कार्यालयानुसार, एन्सेनाडा शहरातील सॅन व्हिसेंटे भागात ऑल-टेरेन कार रेसिंग शो दरम्यान हा हल्ला झाला.
हल्ला झाल्यानंतर 911 वरुन कॉल करुन माहिती देण्यात आली. दुपारच्या सुमारास गॅस स्टेशनवरील बंदूकधारी लोकांनकडून गोळीबार हा करण्यात आला. या नंतर महानगरपालिका आणि राज्य पोलीस, मरीन, अग्निशमन विभाग आणि मेक्सिकन रेड क्रॉस, इतर एजन्सी घटनास्थळी दाखल झाल्या.
महापौर अरमांडो अयाला रोबल्स म्हणाले की राज्याचे ऍटर्नी जनरल रिकार्डो इव्हान कार्पियो सांचेझ यांनी गोळीबाराची चौकशी करण्यासाठी एक स्पेशल ग्रुपची निर्मीती केली आहे. पीडितांची ओळख किंवा राष्ट्रीयत्व अद्याप सार्वजनिक करण्यात आलेले नाही. मेक्सिकोच्या रेड क्रॉसने जखमींना नॉर्दर्न बाजा कॅलिफोर्नियामधील हॉस्पिटलमध्ये नेले.