Rishi Sunak : इन्फोसीसचे जावई होणार ब्रिटनचे नवे पंतप्रधान? जाणून घ्या ऋषि सुनक यांचं भारतीय कनेक्शन
Rishi Sunak (Photo Credit - Twitter)

इन्फोसीसचे (Infosys) फाउंडर नारायण मुर्तींचे (Narayan Murty) जावई ऋषी सुनक (Rishi Sunak) ब्रिटेनचे नवे पंतप्रधान म्हणून विराजमान होणार असल्याची शक्यता आहे. ऋषी सुनक यांनी अर्थमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर बॉरिस जॉन्सन (Boris Johnson) यांच्या विरोधात राजीनाम्याची मागणी करण्यात आली. नंतर बोरिस जॉन्सन यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला. आता भारतीय वंशाचे ऋषि सुनक ब्रिटनचे नवीन पंतप्रधान म्हणून विराजमान होवू शकतात. पक्षातील 40 खासदारांनी राजीनामा दिल्यानं बोरिस जॉन्सन यांच्यावर राजकीय दबाव वाढला होता. अर्थमंत्री (Finance Minister) ऋषी सुनक यांनी राजीनामा दिल्यानंतर कन्झर्व्हेटिव्ह पक्षात राजीनाम्याची लाट सुरु झाली. ऋषी सुनक ब्रिटनचे  भारतीय वंशाचे पहिले पंतप्रधान (Prime Minister) असतील.

बोरिस जॉन्सन याना का द्यावा लागला राजीनामा?

जूनमध्ये बोरिस जॉन्सन यांच्याविरोधात पक्षांतर्गत अविश्वास प्रस्ताव आणला. त्यात बोरिस जॉन्सन यांनी खुर्ची वाचवली. पण यानंतर पक्षातील मंत्र्यांनी राजीनामे देण्यास सुरुवात केली. आणि बोरिस संकटात आले. बुधवार सायंकाळपर्यंत 40 च्या जवळपास मंत्र्यांनी राजीनामे दिले. यामागे विविध कारणे आहेत आणि तसेच मागच्या महिन्यात झालेल्या दोन पोटनिवडणुकांमध्येही कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाला पराभव पत्करावा लागला. (हे ही वाचा:-Ex-Japan PM Shinzo Abe यांच्या हत्येच्या निषेधार्थ भारतात 9 जुलैला एकदिवसीय राष्ट्रीय दुखवटा जाहीर)

कोण आहेत ऋषि सुनक?

ऋषी सुनक यांचे पालक आजी-आजोबांसोबत ब्रिटनला (Britain) गेले होते. त्यानंतर 1980 मध्ये हॅम्पशायरच्या साऊथ हॅम्पटनमध्ये ऋषी सुनक यांचा जन्म झाला.त्यांनी विंचेस्टर कॉलेज या खाजगी शाळेतून शालेय शिक्षण घेतलं. त्यानंतर ऑक्सफोर्ड (Oxford) विद्यापीठातून तत्त्वज्ञान ,राजकारण, आणि अर्थशास्त्रात उच्च शिक्षण घेतलं. नंतर स्टँडफोर्ड विद्यापीठातून एमबीएचं (MBA) शिक्षण पूर्ण केलं.राजकारणात येण्यापूर्वी ऋषी सुनक यांनी गोल्डमॅन सॅकमध्ये काम केलं आहे. त्यानंतर त्यांनी स्वत:ची एक गुंतवणूक कंपनी स्थापन केली. ते सरकारमध्ये आधी ज्युनिअर मंत्री होते. त्यांना 2018 साली ब्रिटनचे निवास मंत्री करण्यात आलं. कोरोनाच्या (Corona) काळात ऋषी सुनक यांनी देशाला मंदीतून यशस्वीपणे बाहेर काढलं. सर्व विभागांना खूश करण्यात ऋषी सुनक यशस्वी ठरल्याने त्याचे कौतुक झाले आणि नंतर ते ब्रिटेनचे अर्थमंत्री झालेत. अर्थ मंत्रालय ब्रिटिश सरकारमध्ये दुसरं महत्त्वाचं पद मानलं जातं. ऋषी सुनक ब्रिटनमध्ये अशा महत्त्वाच्या पदी पोचणारे पहिले भारतीय आहेत.