
जगभरात कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) वाढलेल्या संसर्गामुळे 11 हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, तर सुमारे 2 लाख 90 हजार लोकांना याचा संसर्ग झाला आहे. आतापर्यंत कोरोना व्हायरसने संक्रमित 93 हजाराहून अधिक लोक बरे झाले आहेत. अशात कोरोनाच्या घाबरून गेलेल्या वातावरणात, फ्रेंच वैद्यकीय संशोधकांनी कोरोना व्हायरसच्या औषधाची यशस्वी चाचणी केल्याचा दावा केला आहे. यामुळे केवळ सहा दिवसांमध्ये या विषाणूचे संक्रामक होण्यापासून रोखणे शक्य आहे. प्रोफेसर डिडिअर राउल्ट (Didier Raoult) यांनी याबाबत माहिती दिली आहे. प्रोफेसर राउल्ट हे एक संसर्गजन्य रोग तज्ञ आहेत.
connexionfrance.com च्या म्हणण्यानुसार, 'इन्सिट्यूट हॉस्पिटलो-युनिव्हर्सिटीअर' (IHU Mediterranee) चे प्रोफेसर डिडिअर राउल्ट यांनी, या आठवड्याच्या सुरूवातीस झालेल्या चाचण्यांचे स्पष्टीकरण देण्यासाठी एक व्हिडिओ तयार केला आहे. या चाचणीबाबत माहिती देताना ते म्हणाले की, ‘मी क्लोरोक्वीनने (Chloroquine) उपचार केलेले कोरोनो व्हायरस रूग्ण वेगाने बरे होत आहेत. क्लोरोक्विनचा वापर मलेरियाच्या रुग्णांसाठी केला जातो. अमेरिकन औषध प्रशासनानेही कोरोनो व्हायरसच्या रूग्णांच्या उपचारासाठी या औषधाच्या वापरास मान्यता दिली आहे.'
नाइस आणि अॅव्हिग्नन या दोन गावांमधील, ज्या रुग्णांवर उपचार झाले नाहीत अशा कोरोना व्हायरसच्या रुग्णांवर, या औषधाच्या माध्यमातून उपचार करण्यात आले. 24 रूग्णांना हे औषध देण्यात आले. या औषध प्रक्रियेसाठी हे रुग्ण स्वेच्छेने रुग्णालयात आले होते. रुग्णांना दररोज दहा दिवसांसाठी 600mcg डोस देण्यात आला. यादरम्यान काही प्रकरणांमध्ये त्याचे तीव्र दुष्परिणाम होऊ शकतात, म्हणून त्यांचे बारकाईने परीक्षण केले गेले. त्यानंतर सहा दिवसांमध्ये या रुग्णांची परिस्थिती सुधारली. (हेही वाचा: Coronavirus च्या संकटात पाकिस्तानच्या मदतीला धावला चीन; 3 लाख मास्क, 10 हजार प्रोटेक्टीव्ह सूट व 4 मिलियन डॉलर्सची मदत)
दरम्यान, क्लोरोक्वाइन फॉस्फेट आणि हायड्रॉक्सीक्लोरोक्विन यापूर्वी कोरोना व्हायरस क्लिनिकल चाचण्यांमध्ये, कोरोना व्हायरस रूग्णांवर उपचार करण्यासाठी चीनमध्ये वापरले गेले होते.