Recession In Japan:  जपान च्या अर्थव्यवस्थेत घसरण; जगातील तिसर्‍या प्रमुख अर्थव्यवस्थेचा  गमावला मान
Japan | Pixabay.com

जपान (Japan) मंदीच्या गर्तेत अडकल्याने आता जगातील तिसरी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था असल्याचा मान तिने गमावला आहे. जर्मनीने (Germany) जपानला मागे टाकल्याचं वृत्त CNN च्या रिपोर्ट्स मधून समोर आलं आहे. जपानच्या अर्थव्यवस्थेत ऑक्टोबर ते डिसेंबरच्या तिमाही मध्ये घसरण पहायला मिळाली आहे. जपानमधील वाढत्या महागाईमुळे देशांतर्गत मागणी आणि खाजगी वापरावर परिणाम झाला आहे. तांत्रिकदृष्ट्या पाहता, देश आता मंदीच्या गर्तेत सापडला आहे. जपानच्या अर्थव्यवस्थेत तिमाही-दर-तिमाही आधारावर सलग दुसऱ्या तिमाहीत घसरण नोंदवण्यात आली आहे. Job Opportunities in Germany: जर्मनीच्या Baden-Württemberg येथे कुशल मनुष्यबळाची कमतरता; महाराष्ट्रातील विद्यार्थी भागवणार त्यांची ही गरज, लवकरच होणार सामंजस्य करार .

जुलै-सप्टेंबर या कालावधीत सुधारित 3.3% घसरणीनंतर एका वर्षापूर्वीच्या चौथ्या तिमाहीत प्रोविजनल ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट मध्ये 0.4% घट झाली आहे. या घसरणीनंतर, सेंट्रल बँक ऑफ जपानचे गव्हर्नर Kazuo Ueda यांच्यासाठी व्याजदर सामान्य करणं अधिक गुंतागुंतीचे झाले आहे. याशिवाय, आर्थिक धोरणाच्या मुद्द्याबाबत जपानचे पंतप्रधान Fumio Kishida यांच्यासमोरही मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, 2023 साठी जपानचा GDP $4.2 ट्रिलियन होता. येनच्या घसरणीमुळे हा मोठा बदल दिसून आला आहे. 2022 मध्ये, जपानचे चलन डॉलरच्या तुलनेत सुमारे 20 टक्क्यांनी घसरले, तर गेल्या वर्षी ते 7 टक्क्यांनी घसरले होते. नक्की वाचा: UN कडून भारताचं कौतुक; देशाची अर्थव्यवस्था 2024 पर्यंत 6.7% पर्यंत वाढण्याची वर्तवली शक्यता .

आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) चा अंदाज आहे की भारताची अर्थव्यवस्था 2026 मध्ये जपान आणि 2027 मध्ये जर्मनीला मागे टाकेल आणि जगातील तीन प्रमुख अर्थव्यवस्था असलेल्या देशांच्या यादीत सामील होईल. सध्या जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांच्या यादीत भारत पाचव्या क्रमांकावर आहे.