'खरी अयोध्या नेपाळमध्ये आहे, भारतात नाही व भगवान राम भारतीय नसून नेपाळी आहे'; नेपाळचे पंतप्रधान KP Sharma Oli यांचा दावा
K P Sharma Oli (Photo Credits: KP Sharma Oli Facebook)

एकीकडे नेपाळचे  (Nepal) पंतप्रधान के.पी. ओली (KP Sharma Oli) आपली खुर्ची वाचवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत, तर दुसरीकडे ते भारताविरूद्ध बरीच वक्तव्येही करीत आहेत. जनतेची सहानुभूती मिळवण्यासाठी चीनच्या चालीवर चालणारे केपी ओली कधी भारतामधील प्रदेश स्वतःच्या नकाशामध्ये जोडत आहेत, तर कधी नेपाळमध्ये कोरोना विषाणूचा प्रसार करण्यासाठी भारतातून आलेल्या लोकांना दोष देत आहेत. आता तर त्यांनी हद्दच केली आहे. के.पी. शर्मा ओली यांनी दावा केला आहे की, भारताने नेपाळवर सांस्कृतिकदृष्ट्या अतिक्रमण करून भारतात खोटी अयोध्या स्थापन केली आहे. इतकेच नव्हे तर भगवान राम (Lord Ram) हे नेपाळी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

एएनआय ट्वीट -

207 व्या भानुभक्त जयंतीनिमित्त पंतप्रधानांच्या निवासस्थानी मदन भंडारी कला साहित्य प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले, ‘नेपाळमधील बिरगंजच्या पश्चिमेला भगवान राम यांचे साम्राज्य असून, भारताने वादग्रस्त अयोध्याची स्थापना केली होती. भगवान राम हे मुळचे नेपाळी आहेत, भारतीय नाही.’ या कार्यक्रमात बोलताना ओली म्हणाले की, ‘आम्ही अजूनही या भ्रमात आहोत की ज्या रामांनी सीतेशी लग्न केले आहे ते एक भारतीय आहेत, परंतु ते भारतीय नसून नेपाळी आहेत.’ (हेही वाचा: नेपाळच्या नवीन नकाशाला राष्ट्रपती विद्यादेवी भंडारी यांची मंजुरी; भारताच्या लिपुलेख, कालापाणी आणि लिम्पियाधुरा परिसरांचा समावेश

Lord Ram is Nepali Not Indian: K.P.Sharma Oli - 'भगवान राम हे नेपाळी असून खरी अयोध्या नेपाळमध्ये आहे' - Watch Video 

ओली यापूर्वी म्हणाले होते की, भारत त्यांना सत्तेवरून दूर करण्याचा कट रचत आहे. दरम्यान, नेपाळमध्ये अनेक दिवसांपासून केपी ओली यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन पुढे ढकलल्यानंतर आता केपी ओली अध्यादेश आणून पक्ष फोडू शकतात. वृत्तपत्र इकॉनॉमिक टाइम्सला, ओली हे मुख्य पाठिंबा मिळू शकेल म्हणून, विरोधी पक्ष नेपाळ कॉंग्रेसशी संपर्कात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. अध्यादेश आणून ओली पॉलिटिकल )अॅक्ट बदलू शकतात, यामुळे त्यांना पक्षात विभाजन करणे सुलभ होईल. चीन आणि पाकिस्तानच्या पाठिंब्याने हे सर्व घडत आहे.