भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीं ह्यूस्टनला पोहोचले, ऊर्जा क्षेत्रातील सीईओंची घेतली भेट
Howdy Modi Event 2019 (Photo Credits: Screengrab/ Youtube)

भारताचे पंतप्रधान नरेद्र मोदी (Narendra Modi) एक आठवड्याच्या अमेरिकेच्या (America) दौऱ्यावर आहेत. दरम्यान, आज रात्री ८.३० वाजता नरेंद्र मोदी हे हाऊडी मोदी (Howdy Modi) कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. सध्या नरेंद्र मोदी अमेरिकेतील ह्यूस्टन (Houston) येथे पोहचले आहेत. त्यावेळी अमेरिकेतील दिग्गजांनी मोदींचे स्वागत केले आहे. त्यानंतर मोदींनी अमेरितील तेल क्षेत्रातील विविध कंपनींच्या सीईओं यांच्याबरोबर बैठक घेतली आहे. ही बैठक भारतीय नागरिकांच्या (Indian Citizen) दृष्टीकोनातून पाहिले तर, अतिशय महत्वपूर्ण मानली जात आहे. यातून भारत आणि अमेरिकेा यांच्यातील संबंध आखणी घट्ट होणार असल्याचे, म्हटले जात आहे.

नरेंद्र मोदी हे अमेरिकेतील 'एनर्जी सिटी' समजल्या जाणाऱ्या ह्यूस्टन येथील जॉर्ज बुश आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले. मोदीं हे विमानातून उतरताच ट्रे़ड अॅंड इंटरनॅशनल अफेर्सचे संचालक ख्रिस्तफर ओल्सन यांनी मोदींचे स्वागत केले. मोदीं याच्या स्वागत दरम्यान, अमेरिकेचे अनेक अधिकारीही उपस्थित होते. मोदींनी तिथे उपस्थित असलेल्या सर्व अधिकाऱ्याशी हस्तांदोलन केले. हे देखील वाचा- ABP News Opinion Poll अनुसार महाराष्ट्रात कांग्रेस-एनसीपी गठबंधन पुन्हा राहणार सत्तेपासुन दूर, जाणून घ्या कुठल्या पक्षाला किती जागा मिळण्याचा अंदाज

ट्विट-

ट्रम्प प्रशासन पुढील काही दिवसांत भारतासोबत व्यापार संदर्भात करार करणार असल्याची, शक्यता व्यक्त केली जात आहे. अमेरिकेतील न्यूयॉर्क टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, पंतप्रधान मोदी यांच्या भेटीनंतर या आठवड्यात भारताबरोबर कराराबाबत मोठी घोषणा होऊ शकते. अमेरिका आणि चीन यांच्यात सुरु असलेल्या ट्रेड वॉरमुळे डोनाल्ड ट्रम्प हे नव्या बाजाराचा शोध घेत आहेत.