Maharashtra Assembly Elections 2019: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूकीच्या तारखा कधी जाहीर होणार याची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली होती. तर शनिवारी निवडणूक आयोगाच्या पार पडलेल्या बैठकीत अखेर विधानसभा निवडणूक 21 ऑक्टोंबर रोजी होणार असल्याचे जाहीर करण्यात आले. याच परिस्थितीत एबीपी माझा यांनी महाराष्ट्रातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या सरकारबद्दल काय मत आहे याचा जनमत सर्व्हे जाहीर केला आहे. या सर्व्हेनुसार राज्यातील लोकांच्या मते भाजप (BJP) आणि एनडीचे सरकार अव्वल ठरणार आहे. त्याचसोबत राज्यातील 46 टक्के लोकांना एनडीचे (NDA) सरकार पुन्हा प्रस्थापित व्हावे याची वाट पाहत आहेत. तर दुसऱ्या बाजूला 30 टक्के लोकांना काँग्रेसची सत्ता यावी असे वाटत आहे.
जनमत सर्व्हेनुसार, यंदाच्या विधानसभा निवडणूकीत एनडीए सरकारला 185 ते 205 जागा मिळण्याची शक्यता आहे. तसेच काँग्रेस पक्षाच्या सुद्धा जागा वाढण्याची शक्यता असून त्यांना 42 ते 55 दरम्यान जागा मिळू शकतात. तर अपक्षला 28 जागा मिळण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीसाठी 288 जागा असून त्यामधील एक जागा नॉमिनेटेड आहे.
तसेच सर्व पक्षांनी स्वत:हून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यास भाजपला 144 जागा आणि शिवसेनेला 39 जागा मिळू शकतात. तर काँग्रेस यावेळी सुद्धा सत्तेपासून दूर राहणार आहे. तरीही त्यांना 21 जागा मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला 20 जागा मिळतील. अन्य पक्षाला एकूण 64 जागांवर विजय मिळवता येणार आहे.(Maharashtra Assembly Elections 2019: सर्वच राजकीय पक्ष, उमेदवारांना विधानसभा निवडणूक सोपी नाही; निवडणूक आयोगाकडून अचारसंहिता नियमावली अधिक कडक)
येत्या 21 ऑक्टोंबर रोजी महाराष्ट्रातील जनता विधानसभेसाठी मतदान करणार असून त्याचा निकाल 24 ऑक्टोंबर रोजी लागणार आहे. याच स्थितीत भाजप-शिवसेना युतीला आपली पुन्हा सत्ता येईल अशी अपेक्षा आहे. पण विरोधी पक्ष काँग्रेस कडून एनडीचे सरकार पाडण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. तर शिवसेना-भाजप यांच्या मध्ये जागा वाटपाचवरुन काही मतदभेद आहेत. परंतु आगामी विधानसभा निवडणूक दोन्ही पक्ष एकत्र लढणवार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 135 जागांची मागणी भाजपकडे केली आहे.
तर दुसऱ्या बाजूला 18 जागा मित्रपक्षांना देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये रिपाई (ए), शिव संग्राम पार्टी, राष्ट्रीय समाज पार्टी आणि स्वाभिनान पक्ष यांचा समावेश आहे. तर भाजपचा कमळ हेच चिन्ह निवडणूकीसाठी कायम राहणार आहे. राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडी पक्षामध्ये 125 जागा वाटपाचा फॉर्म्युला असणार असून उर्वरित जागा मित्रपक्षांसाठी सोडण्यात येणार आहेत.