Imran Khan | (Photo Credits: Facebook)

पाकिस्तानच्या (Pakistan) पंतप्रधान कार्यालयाच्या यूट्यूब चॅनलचे नाव बदलण्यात आले आहे. अशा परिस्थितीत पंतप्रधान इम्रान खान (PM Imran Khan) यांनी रविवारी इस्लामाबादमध्ये बोलावलेल्या रॅलीतून पायउतार होण्याची शक्यता बळावली आहे. आपल्या पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (PTI) पक्षाची ताकद दाखवून देण्यासाठी इम्रानने ही रॅली बोलावली आहे. इम्रान सरकार हटवण्यासाठी विरोधकांनी नॅशनल असेंब्लीत अविश्वास प्रस्ताव आणला आहे. इम्रान खान यांनाही वाढत्या आर्थिक आणि सामाजिक आव्हानांचा सामना करावा लागत आहे, कारण त्यांचे सरकार विरोधकांनी लावलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांना सामोरे जात आहे.

इम्रान खान यांनी पाकिस्तानच्या विरोधकांनावर जोरदार हल्ला चढवला. यासोबतच 27 मार्च रोजी इस्लामाबादमधील परेड ग्राऊंडवर मोठ्या संख्येने यावे, असे आवाहन इम्रान खान यांनी केले आहे. पीटीआयने इम्रान खानच्या हवाल्याने म्हटले आहे की, 'उद्या माझ्या लोकांनी परेड ग्राऊंडवर यावे, उद्या आम्ही जनतेचा समुद्र दाखवू!' इम्रान खानसमोर राजकीय आव्हाने वाढली आहेत. (हे देखील वाचा: Pakistan: अविश्वास प्रस्तावापूर्वी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना मोठा झटका, 50 मंत्री बेपत्ता)

इम्रान खानच्या विरोधात त्यांचेच खासदार उभे राहिले

वास्तविक, इम्रान खानचे सरकार आयएमएफसोबत सहा अब्ज डॉलर्सच्या बचाव पॅकेजवर चर्चा करत आहे. शिवाय, सरकारला बेरोजगारी आणि महागाईचा सामना करावा लागतो. इस्लामाबादमध्ये पीपीपीच्या लाँग मार्चनंतर, 8 मार्च रोजी विरोधी पक्षांनी अविश्वास प्रस्ताव आणला होता. पीटीआयचे अनेक खासदार इम्रान खानच्या विरोधात उभे राहिल्याने या प्रस्तावाला यश मिळेल, असा विश्वास विरोधकांना आहे. एक्स्प्रेस ट्रिब्यूनने शुक्रवारी सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की अविश्वास प्रस्तावाचे सत्र जवळ येत असताना सत्ताधारी पक्षाचे किमान पन्नास मंत्री राजकीय आघाडीतून "बेपत्ता" झाले आहेत.