पासपोर्ट Photo Credits : Pixabay

आंतरराष्ट्रीय स्तरावर पासपोर्टचं रॅकिंग त्या विशिष्ट देशाची ओळख बनवण्यास महत्त्वाची भूमिका पार पाडतो. पासपोर्टच्या ग्लोबल इंडेक्स रॅंकिंगवर युरोपियन देशांचा दबदबा अधिक असतो. मात्र आता मागील दोन वर्षात हे चित्र बदलताना दिसत आहे. अनेक आशियाई देशांचं रॅंकिंग अव्वल स्थानी आहे.

Henley पासपोर्ट इंडेक्सने 2018 सालची पावरफूल व्हिजा लिस्ट घोषित केली आहे. यानुसार जपानचा पासपोर्ट या यादीमध्ये अव्वल स्थानी आहे. मागीलवर्षी सिंगापूर हा देश या यादीमध्ये अव्वल स्थानी होता. मात्र यंदा जपानने त्यावर मात केली आहे.

कोणत्या निकषावर ठरतं रॅंकिंग ?

ज्या पासपोर्टवर सर्वाधिक व्हिजा ऑन अरायव्हलचा पर्याय उपलब्ध असतो तो देश किंवा पासपोर्ट अधिक चांगलं रॅंकिंग मिळवतं. जपानच्या पासपोर्टधारकांना 190 देशांमध्ये व्हिजा ऑन अरायव्हलचा पर्याय दिला जातो. यंदा जपानने म्यानमारलाही व्हिजा ऑन अरायव्हलचा पर्याय खुला करून दिल्याने तो सर्वात शक्तिशाली पासपोर्ट बनला आहे.

जपानचा पासपोर्ट अव्वल स्थानी, दुसर्‍या स्थानी सिंगापूर पासपोर्ट, तिसर्‍या स्थानी जर्मनी, दक्षिण कोरिया आणि फ्रांसचा समावेश होतो.

भारताचं रॅकिंग किती ?

पावरफूल पासपोर्टच्या यादीमध्ये भारताचा क्रमांक 81 आहे. भारतीय पासपोर्ट धारकांना 60 देशांमध्ये व्हिजा ऑन अरायव्हलची सोय मिळते. तर पाकिस्तान पासपोर्टधारकांना 33 देशांमध्ये ही सोय देण्यात आली आहे. भारतीयांनो ! आता व्हिसाशिवाय फिरू शकता हे सुंदर देश

अमेरिका आणि ब्रिटन पासपोर्टधारकांना 186 देशांमध्ये व्हिजा ऑन अरायव्हल मिळतो. या यादीमध्ये ते पाचव्या स्थानी आहेत.