PNB SCAM: लंडन मधील रस्त्यांवर दिसला नीरव मोदी, घोटाळ्यासंबंधित प्रश्न विचारल्यास उत्तर देण्यास नाकारले
नीरव मोदी (Photo Credit- Twitter-The Telegraph)

पंजाब नॅशनल बँक (PNB) मधून 1300 करोड रुपयांचे कर्ज घेऊन पळालेला हिरे व्यापारी नीरव मोदी (Nirav Modi) ह्याने आपले रुप बदलले आहे. देशातून पळ काढल्यानंतर आता पहिल्यांदाच नीरव मोदी ह्याचा फोटो समोर आला आहे. भारतीय कंपन्यांकडून नीरव मोदीचा शोध घेतला जात आहे. मात्र नीरव हा लंडन (London) मध्ये फिरताना दिसून आला आहे. यावेळी त्याने आपला लूक पूर्णपणे बदलला आहे. याबाबत इंग्लड मधील वृत्तपत्र 'द टेलिग्राफ' (The Telegraph) यांनी माहिती दिली आहे.

वृत्तपत्राच्या पत्रकाराने नीरव मोदीला खूप प्रश्न विचारले. मात्र मोदी ह्याने कोणत्याही प्रश्नाचे उत्तर दिले नाही. तसेच प्रश्नावर उत्तर देण्यासाठी त्याला सांगितले असता त्याने वारंवार नो कमेंट असे म्हणत होता.(हेही वाचा-व्हिडिओ: स्फोटकांनीही टेकले हात; नीरव मोदी याचा बंगला खचला परंतू पडला नाही)

.तर सीआरझेड (CRZ Act) कायद्याचे उल्लंघन करुन बांधन्यात आलेल्या या बंगल्याच्या पाडकामाच्या कारवाईस दोन महिन्यांपूर्वीच सुरुवात झाली होती. मशीनच्या सहाय्याने हा बंगला पाडण्यात प्रशासनाला अपयश आले. त्यामुळे हा बंगला नियंत्रित स्फोटके वापरुन पाडण्याचा प्रयत्न शुक्रवारी (8 मार्च 2018) करण्यात आला. त्यासाठी 30 किलो स्फोटकं वापरण्यात आली. परंतू, स्फोटकांनीही हार मानली. हा बंगला पडला नाहीच. तो केवळ जागेवरच खचला. त्यामुळे 'ये दीवार टुटती क्यू नही!', असा सवाल प्रशासनाला पडला होता.