PM Modi Visit Ukraine (Photo Credit - X/ANI)

PM Modi Visit Ukraine: रशिया-युक्रेन युद्ध (Russia-Ukraine War) सुरू झाल्यानंतर अडीच वर्षांनी पंतप्रधान मोदी (PM Modi) आज युक्रेन (Ukraine) मध्ये पोहोचणार आहेत. गुरुवारी रात्री ते पोलंडहून निघाले. 10 तासांच्या ट्रेन प्रवासानंतर ते युक्रेनला पोहोचतील. या भेटीदरम्यान पंतप्रधान मोदी युक्रेनची राजधानी कीवमध्ये 7 तास घालवणार आहेत. भारतीय पंतप्रधान युक्रेनला भेट देण्याची ही पहिलीच वेळ आहे. 1991 मध्ये सोव्हिएत युनियन तुटल्यामुळे युक्रेनची निर्मिती झाल्यापासून एकाही भारतीय पंतप्रधानाने युक्रेनला भेट दिली नव्हती.

पीएम मोदींची ही भेट खास आहे. कारण, 24 फेब्रुवारी 2022 रोजी रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यापासून नाटो देशांव्यतिरिक्त इतर कोणत्याही देशाच्या नेत्याने युक्रेनला भेट दिली नाही. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की (Volodymyr Zelenskyy) यांनी काही महिन्यांपूर्वी पंतप्रधान मोदींना युक्रेन भेटीचे निमंत्रण दिले होते. यापूर्वी, मे 2023 मध्ये जपानमध्ये झालेल्या G-7 शिखर परिषदेदरम्यान युद्धानंतर मोदी आणि झेलेन्स्की पहिल्यांदा भेटले होते. (हेही वाचा -Narendra Modi Poland and Ukraine Tour: पंतप्रधान मोदी 21 ऑगस्टला पोलंड, 23 ऑगस्टला युक्रेनला भेट देणार; रशियाच्या भूमिकेकडे लक्ष)

युक्रेन भेटीदरम्यान पंतप्रधान मोदी राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशी चर्चा करतील, ज्यामध्ये द्विपक्षीय आणि बहुपक्षीय सहकार्याच्या मुद्द्यांवर चर्चा केली जाईल. या कालावधीत युक्रेन आणि भारत यांच्यात अनेक कागदपत्रांवर स्वाक्षऱ्या होतील. याशिवाय, पंतप्रधान मोदी युक्रेनमध्ये विद्यार्थ्यांसह भारतीय समुदायाच्या लोकांनाही भेटणार आहेत. पीएम मोदी आणि झेलेन्स्की यांच्यातील ही तिसरी भेट असणार आहे. (हेही वाचा - Ukraine Russia Crisis: युक्रेनमध्ये अडकलेल्या 183 भारतीय नागरिकांना घेऊन बुखारेस्टहून विशेष विमान मुंबईत पोहोचले, अजुनही मदतीची गरज)

युक्रेनला भेट देण्यापूर्वी पीएम मोदी 21 आणि 22 ऑगस्ट रोजी पोलंडच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर होते. यादरम्यान त्यांनी गुरुवारी पोलंडचे पंतप्रधान डोनाल्ड टस्क यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकही घेतली. बैठकीनंतर दोन्ही देशांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत पंतप्रधान मोदी म्हणाले की, कोणत्याही संकटात निष्पाप जीव गमावणे हे मानवतेचे सर्वात मोठे आव्हान बनले आहे.