भारतासोबत युद्ध झाल्यास पाकिस्तानला लढाई जिंकणे मुश्किलच- इमरान खान
Imran Khan (Photo Credits: IANS)

पाकिस्तान (Pakistan) पंतप्रधान इमरान खान (Imran Khan) यांनी पुन्हा एकदा अणू युद्धाची धमकी दिली आहे. त्याचसोबत भारतासोबत (India) युद्ध झाल्यास पाकिस्तानचाच पराभव होणार असल्याचे इमरान खान यांनी म्हटले आहे. मात्र आता लढाई झाल्यास अणु युद्धच होणार आहे. तर कश्मीरच्या मुद्दावरुन भारताने घेतलेल्या निर्णयानंतर पाकिस्तानची तणतणली असून त्यांनी याच कारणामुळे युद्धाची भाषा केली असल्याचे म्हटले जात आहे.

कश्मीर मधून कलम 370 हटवल्याच्या संतापावरुन इमरान खान यांनी युद्ध करणार असल्याचे म्हटले आहे. तसेच भारतासोबत आता अणु युद्ध होईलच पण याचे परिणाम भयावह ही होणार असल्याचे खान यांनी म्हटले आहे. युद्धाबाबतच्या धोक्याबात काय परिणाम होऊ शकतात इमरान खान यांनी अधिक स्पष्टीकरण दिले आहे. त्याचसोबत असे ही म्हटले आहे की, पाकिस्तान प्रथम कधीच अणू युद्ध सुरु करणार नाही. एवढेच नाही मी शांत आणि युद्धाच्या विरोधी असल्याचे ही विधान इमरान खान यांनी अल जजीरा यांना दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.(पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती बिकट; डिझेल पेक्षा दुधाचे भाव अधिक)

परंतु पाकिस्तानला विजय मिळवून देण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत लढाई करुच. मात्र एक अणु संपन्न देश युद्धाच्या अंतापर्यंत लढाई सुरु ठेवल्यानंतर त्याचे परिणाम प्रचंड वाईट असतात. त्यामुळेच आम्ही संयुक्त राष्ट्रांसोबत संपर्क केला आहे. तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर संपर्क करण्याचा प्रयत्न करत असून त्यांनी याबाबत काही तरी पाऊल उचलावे अशी अपेक्षा करत आहोत. तर कश्मीरला देण्यात आलेला विशेष राज्याचा दर्जा काढून टाकल्यानंतर भारताने त्यावर अनधिकृतपणे त्यावर आपले वर्चस्व मिळवले असल्याचेही इमरान खान यांनी म्हटले आहे.