पाकिस्तान (Pakistan) नेहमीच भारतावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत असतो. तर गेल्या काही महिन्यांपूर्वी जम्मू-कश्मीर (Jammu-Kashmir) मधून कलम 370 रद्द केल्यानंतर पाकिस्तान संतप्त झाला होता. तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानला ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्यात यावे अशी मागणी भारताने केली होती. त्यानंतर सुद्धा भारतावर हल्ले करण्याचे पाकिस्तानने थांबवलेले नाही. या हल्लांबाबत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या सरकारमधील मंत्री आणि नेते मंडळी उघडपणे बोलतात. तर भारतातील मोठ्या दहशतवादी हल्ल्यांमागे पाकिस्तानचा हात असल्याचे एका मंत्र्याने कबुल केले आहे.
पाकिस्तान मधील जिओ टीव्हीच्या एका कार्यक्रमात बुधवारी इम्रान खान आणि अन्य पक्षांमध्ये चर्चा झाली. त्यामध्ये मंत्र्यांनी भारतावर पाकिस्तान दहशतवादी हल्ले करत असल्याची कबुली मंत्री अली मोहम्मद खान यांनी दिली आहे. तसेच भारतावर पाकिस्तान सहज हल्ले करुन जातो आणि भारत त्याबबात फक्त पाहण्याची भुमिका घेत असल्याचे ही त्यांनी म्हटले आहे.
मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय सशस्र बळाला उद्देशून असे म्हटले की, पाकिस्तानवर कुरघोडी करण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा कालावधीच पुरेसा आहे. नरेंद्र मोदी यांच्या या विधानानंतर टॉक शो मध्ये उपस्थित असलेल्या तीन नेत्यांनी असे म्हटले आहे की, भारत पाकिस्तानला हलक्या मध्ये घेत आहे. तसेच युद्ध झाल्यास भारताला पाकिस्तान सडेतोड उत्तर देत जुने हिशोब चुकते करु शकतो. (कलम 370 रद्द केल्यानंतर पाकिस्तानने घेतला भारतासोबत व्यापार संबंध तोडण्याचा निर्णय)
तर काही दिवसांपूर्वी इम्रान खान एक विधान करत असे म्हटले की, पाकिस्तानात लैंगिक शोषणाचे प्रकार वाढण्यामागील कारण म्हणजे बॉलिवूड चित्रपट आहे. लैंगिक शोषणाबाबत असे विधान करत त्यांनी याचे खापर आता बॉलिवूडवर फोडले होते. देशातील वाढते लैंगिक शोषणाचे प्रकारासाठी बॉलिवूड आणि हॉलिवूडचे चित्रपट जबाबदार आहेत. ऐवढेच नव्हे तर मोबाईल आणि इंटरनेटच्या माध्यमातून पाकिस्तानात या दोन्ही माध्यमातील कन्टेट येत असल्याने त्याचा तरुणांवर परिणाम झाल्याचे म्हटले होते.