Korean Streamer Sexually Assaulted By Indian Man: लाइव्ह प्रसारणादरम्यान हाँगकाँगमध्ये कोरियन स्ट्रीमरवर भारतीय व्यक्तीकडून लैंगिक अत्याचार; व्हिडिओ व्हायरल

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एका हॉंगकॉंगमधील कोरियन आयआरएल स्ट्रीमर असलेली तरूणीवर भारतीय पुरुषाने लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

Korean Streamer Sexually Assaulted By Indian Man: लाइव्ह प्रसारणादरम्यान हाँगकाँगमध्ये कोरियन स्ट्रीमरवर भारतीय व्यक्तीकडून लैंगिक अत्याचार; व्हिडिओ व्हायरल
Viral video

Korean Streamer Sexually Assaulted By Indian Man:  सोशल मीडियावर एक खळबळजनक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एका हॉंगकॉंगमधील कोरियन आयआरएल स्ट्रीमर असलेली तरूणीवर भारतीय पुरुषाने लैंगिक अत्याचार केल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. घरी परतत असताना मोबाईलवर तीने लाईव्ह स्टीमिंग चालू केल होतं दरम्यान एक भारतीय व्यक्ती तीचा खांद्यावर हात ठेवून तीला जवळ  येण्यास बोलत होता. तीने त्याला हाताने दुर केलं. पुन्हा त्या मुलाचा पाठलाग करत होता.मुलीने मदतीसाठी आरडाओरड केला. पुरुषाने निल्लर्जपणे महिलेच्या अंगावर हात ठेवला. तीचा लैंगिक छळ करत होता. या सर्व घटना एका व्यक्तीने  व्हिडिओ स्वरूपात कैद झाल्याने ही धक्कादायक घटना समोर आली. सुदैवाने घटनास्थळाजवळ असलेल्या दुसर्‍या प्रवाशाने अलार्म लावला, परिणामी आरोपी घटनास्थळावरून पळून गेला.

(The above story first appeared on LatestLY on Sep 12, 2023 01:03 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).