काही महिन्यांपूर्वी बंगळूरू येथे एका मोठ्या आवाजाने संपूर्ण शहर हादरले होते. काहींनी हा आवाज भूकंपाचे असल्याचे सांगितले होते. त्यावेळी या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते, आता तशीच परिस्थिती उदभवली आहे ती पॅरिसमध्ये (Paris). पॅरिस आणि त्याच्या आसपासच्या भागात जोरात मोठा आवाज ऐकू आला. मिळालेल्या माहितीनुसार प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, स्फोटाच्या आवाजाने त्यांना इमारती हलत आहेत असे वाटले. स्फोटाचा आवाज संपूर्ण पॅरिस तसेच आसपासच्या उपनगरामध्ये ऐकू आला. एका फायटर जेटने (Fighter Jet) ध्वनीतीव्रतेची कमाल पातळी ओलांडल्याने हा आवाज ऐकू आल्याची माहिती मिळत आहे.
हा आवाज इतका मोठा होता की, यामुळे लोकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. या आवाजामुळे कुठेही धूर किंवा आग लागल्याची घटना घडली नाही, तसेच इतरही काही नुकसान झाले नाही. सध्या पॅरिसमध्ये रोलँड गॅरोस टेनिस स्पर्धा सुरु आहे. या आवाजामुळे त्यामध्येही काही प्रमाणात खंड पडला होता. या आवाजाबाबत अजून काही माहिती मिळू शकली नाही. (हेही वाचा: कानठळ्या बसवण्याऱ्या आवाजाने हादरले बेंगळूरू; भूकंप झाली की विमान उडाले? पोलिसांचा तपास सुरु)
Explosion in Paris heard from games at Rolland Garros pic.twitter.com/3eVhSLrXQQ
— . (@wiIffff) September 30, 2020
दरम्यान, फ्रान्सची राजधानी पॅरिसमधील 'चार्ली अब्दो' या व्यंगात्मक साप्ताहिक नियतकालिकेच्या माजी कार्यालयाजवळ शुक्रवारी चाकूच्या हल्ल्यात चार जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी ही माहिती दिली व या घटनेनंतर संपूर्ण शहरात अलर्टवर आहे. तसेच गेल्या आठवड्यात आयफेल टॉवरला बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली होती. त्यानंतर आयफेल टॉवर रिकामे करण्यासाठी पोलिस पोहोचले तेव्हा एक व्यक्ती अल्लाह-ओ-अकबर असे मोठ्याने ओरडू लागला. आपण सर्व काही उडवून देऊ असेही तो म्हणत होता. त्या वेळी आयफेल टॉवर आणि आजूबाजूचा परिसर रिकामा करण्यात आला होता. मात्र पोलिसांना काहीही आढळले नाही.