Imran Khan Arrest | (Photo Credit - Twitter)

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (Pakistan Tehreek-e-Insaf) या पक्षाचे अध्यक्ष इम्रान खान (Imran Khan) यांना अटक झाली आहे. अल-कादिर ट्रस्ट प्रकरणात इस्लामाबाद उच्च न्यायालयाच्या बाहेरून निमलष्करी रेंजर्सनी खान यांना मंगळवारी (9 मे 2023) अटक करण्यात आली. इम्रान खान यांना अटक करण्यात आली तेव्हा त्यांच्यासोबत रेंजर्सचा मोठा ताफा रवाना झाला. वय वर्षे 70 असलेले इम्रान खान हे माजी क्रिकेटपटू आणि विद्यमान राजकारणी आहेत. इम्रान खान यांच्या अटकेसंदर्भात एनबी अधिकाऱ्यांकडे वॉरंट होते. इस्लामाबादचे आयजी यांनी सांगितले की, खान यांच्या अटकेनंतर कलम 144 लागू करण्यात आले आहे. त्याचे उल्लंघन केल्यास कारवाई केली जाील.

दरम्यान, पीटीआय (Pakistan Pakistan Tehreek-e-Insaf) पक्षाचे वकील फैसल चौधरी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, पीटीआयचे अध्यक्ष इम्रान खान हे त्यांच्याविरोधात दाखल आरोपांविरोधात न्यायालयात हजर झाले तेव्हा त्यांना रेंजर्सनी ताब्यात घेतले. (हेही वाचा, Mob Lynches In Pakistan: इम्रान खान यांच्या पक्षाच्या रॅलीदरम्यान 'निंदा', पाकिस्तानमध्ये एकाचे 'मॉब लिंचींग')

व्हिडिओ

इमरान खान यांच्या अटकेनंतर पीटीआयचे नेते मुसरत चीमा यांनी ट्विटरवर म्हटले प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले की, विद्यामान पाकिस्तान सरकार सध्या इम्रान खान यांचा छळ करत आहे. ते इम्रान साहेबांना मारहाण करत आहे. त्यांनी साहेबांसोबत काहीतरी केले आहे.

ट्विट

ट्विट

ट्विट

माजी माहिती मंत्री आणि पीटीआयचे उपाध्यक्ष फवाद चौधरी यांनी पुढे दावा केला की "रेंजर्सनी कोर्टावर कब्जा केला आहे" आणि वकिलांचा "छळ केला जात आहे". इम्रान खान यांच्या गाडीला घेराव घालण्यात आला आहे, असेही ते पुढे म्हणाले. पीटीआय नेते अझहर मशवानी यांनी आरोप केला आहे की इम्रान खानला रेंजर्सनी कोर्टाच्या आतून “अपहरण” केले. पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफने (पीटीआय) देशात निदर्शने करण्याचे तात्काळ आवाहन केल्याची माहितीही त्यांनी दिली.