पाकिस्तान: इस्लामाबाद स्थित असलेल्या भारतीय उच्चायोग मधील 2 अधिकारी बेपत्ता
India, Pakistan flags (Photo Credits: PTI)

पाकिस्तानमधील इस्लामबाद स्थित असलेल्या भारतीय उच्चायोग येथे काम करणारे दोन अधिकारी बेपत्ता झाले आहेत. सुत्रांनी असे म्हटले आहे की, हे अधिकारी सकाळच्या वेळेस कार्यालयात येण्यासाठी निघाले होते पण तेथे ते पोहचलेत नाहीत. तसेच सकाळ पासून  हे दोन्ही अधिकारी बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. अधिकृतरित्या या प्रकरणी कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. भारतीय उच्चायोग यांच्याकडून पाकिस्तानी अधिकाऱ्यांकडे हे प्रकरण सोपवण्यात आले असून त्यांच्यासोबत बातचीत सुरु करण्यात आली आहे. भारताने या प्रकरणाबाबात चिंता व्यक्त केली आहे.

काही दिवसांपूर्वी पाकिस्तानात मुत्सद्दी लोकांना त्रास देण्याबाबत भारताने तो मुद्दा उचलून धरला होता. एक व्हिडिओ समोर आला होता त्यामध्ये असे दिसून आले होते की, पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयचे ऐजंट भारतीय मुत्सद्दी गौरव अहलुवालिया यांच्या कारचा दुचाकीवरून पाठलाग करत होते. तसेच काही जण त्यांच्या घराबाहेर गाड्यांमध्ये असल्याचे दिसले होते.(68 वर्षांमध्ये पहिल्यांदाच पाकिस्तानला मोठा झटका; GDP ग्रोथ शून्याच्या खाली, 0.38 टक्क्यांनी घट)

यापूर्वी नवी दिल्लीत स्थित असलेल्या पाकिस्तान उच्चायोग मधील 2 अधिकाऱ्यांना जासूसी करत असल्याच्या आरोपाखाली ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर भारताने निषिद्ध व्यक्ती घोषित करत त्यांना 24 तासाच्या आतमध्ये देश सोडून जाण्याचे आदेश दिले होते. पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आलेल्या दोन व्यक्तींची ओळख पटली असून आबिद हुसैन आणि मोहम्मद ताहीर अशी त्यांची नावे आहेत. हे दोघेजण पैशांच्या बदल्यात भारतीय नागरिकांकडून भारतीय सुरक्षा आस्थापनांबाबत संवेदनशील दस्तावेज मिळवत असताना दिल्ली पोलिसांकडून यांना अटक करण्यात आली होती.