Pakistan Suicide Attack: पाकिस्तानात आत्मघातकी हल्ल्यात पाच नागरिकांचा मृत्यू, चीनने चौकशीची केली मागणी
blast

Pakistan Suicide Attack: पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतातील शांगला जिल्ह्यातील बेशम शहरात ताफ्यावर झालेल्या हल्ल्यात पाच चिनी आणि स्थानिक नागरिकांचा मृत्यू झाल्यानंतर चीनने या घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. "पाकिस्तानमधील चिनी दूतावास आणि वाणिज्य दूतावासांनी आपत्कालीन कारवाया सुरू केल्या आहेत आणि हल्ल्याची कसून चौकशी करावी, दोषींना कठोर शिक्षा करावी आणि चिनी नागरिकांच्या संरक्षणासाठी व्यावहारिक आणि प्रभावी उपाययोजना कराव्यात," असे पाकिस्तानमधील चिनी दूतावासाने एका निवेदनात म्हटले आहे. उपायांची मागणी केली आहे."

द डॉनच्या वृत्तानुसार, बेशमच्या एसएचओने या घटनेत सहा जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली असून त्यात पाच चिनी अभियंते आणि एका पाकिस्तानी नागरिकाचा समावेश आहे. हा एक "आत्मघाती हल्ला" होता. दरम्यान, संबंधित यंत्रणा पुरावे गोळा करत आहेत.

आत्मघातकी हल्लेखोराचे वाहन कुठून आणि कसे आले आणि हा प्रकार कसा घडला याचा तपास आम्ही करत आहोत, असे एसएचओने सांगितले. डॉनने बचाव अधिकाऱ्याच्या हवाल्याने सांगितले की, स्फोटानंतर चिनी नागरिकांना घेऊन जाणारे वाहन खड्ड्यात पडले आणि आग लागली.