पाकिस्तानच्या रेल्वेमंत्र्यांचे TikTok स्टारसोबत अश्लील Chat; शेअर केले Nude Video; सोशल मिडीयावर व्हिडिओ कॉल व्हायरल
शेख रशीद व हरीम शाह (संग्रहित संपादित प्रतिमा)

पाकिस्तानचे (Pakistan) रेल्वेमंत्री शेख रशीद (Sheikh Rasheed Ahmad) पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकताना दिसत आहेत. पाकिस्तानच्या सोशल मीडिया स्टारला अश्लील व्हिडिओ पाठविल्याचा आरोप शेख रशीदवर आहे. पाकिस्तानी सोशल मीडिया स्टार हरीम शाहने (Hareem Shah) रेल्वेमंत्र्यांसह व्हिडिओ कॉलचे एक फुटेज शेअर केले आहे.

हरीमने असा आरोप केला आहे की, शेख रशीद तिला अश्लील व्हिडिओ पाठवत असे. हरीमने शेअर केलेल्या या फुटेजमध्ये व्हिडिओ कॉलवर शेख रशीद हरीम शाहशी संवाद साधताना दिसत आहे.

या फुटेजमध्ये दिसत आहे, व्हिडीओ कॉलवर हरीम रेल्वेमंत्री रशीद यांना म्हणते, ‘मी तुमचे कोणतेच गुपित कोणालाच सांगितले नाही, तरी तुम्ही माझ्याशी बोलणे का बंद केले?’ यावर रशीद उत्तर देतात, ‘हरीम, तुला जे करायचे आहे ते कर.’ त्यानंतर हरीमने रेल्वेमंत्र्यांना ते नागडे होऊन आपल्याला कसे अश्लील व्हिडीओ पाठवायचे याची आठवण करून दिली. मात्र हे ऐकल्यावर रेल्वेमंत्र्यांनी लगेचच व्हिडीओ कॉल कट केला. सध्या सोशल मिडीयावर हे फुटेज प्रचंड व्हायरल होत आहे.

विशेष म्हणजे हरीमने काही तासांनंतर हा व्हिडिओ डिलीट केला होता, पण तोपर्यंत तो व्हायरल झाला होता. #हरीमशाह हा हॅशटॅग पाकिस्तानमध्ये टॉप ट्रेंडिंग होता. व्हिडिओ हटविल्यानंतर हरीमने प्रतिक्रिया दिली आहे की, ‘कोणाचीही बदनामी करण्याचा आपला हेतू नाही. कृपया या प्रकरणाबाबत मला काही विचारू नका, मला एकटे सोडा. माझ्याकडे इतर अनेक गोष्टी करण्यासारख्या आहेत.’

(हेही वाचा: पाकिस्तानची लोकप्रिय TikTok स्टार हरीम शाहचा मॉलमध्ये जमावाकडून विनयभंग; पाहुणी म्हणून बोलावल्यावर लाथा बुक्क्यांनी मारहाण (Video))

दरम्यान काही दिवसांपूर्वी पाकिस्तानच्या परराष्ट्र व्यवहार समितीच्या कक्षात टिकटॉक व्हिडिओ बनवल्यामुळे हरीम वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. तर दुबईमध्ये मॉलच्या उद्घाटनावेळी जमावाकडून विनयभंग झाला असल्याचा आरोपही तिने केला होता. या ठिकाणी पाहुणी म्हणून बोलावल्यावर आपल्याला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली असल्याचे तिचे म्हणणे आहे.