देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. याच पार्श्वभुमीवर पाकिस्तान (Pakistan) पंतप्रधान इमरान खान (Imran Khan) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना एक पत्र लिहिले आहे. त्यामध्ये दोन्ही देशातील संबंधावर पुन्हा एकदा चर्चा व्हावी असे म्हटले आहे. तसेच दोन्ही देशाच्या नातेसंबंधाबद्दल शांतेत चर्चा करावी अशी विनवणी इमरान खान यांनी केली होती.
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, इमरान खान यांनी हे पत्र मोदी यांना पाकिस्तान नॅशनल डे च्या दिवशी मोदी यांनी शुभेच्छा दिल्या होत्या त्याच्या उत्तरात असे म्हटले आहे. तसेच दोन्ही देशातील दहशतवाद आणि हिंसामुक्त वातावरण बनवण्यासाठी दोघांचे नातेसंबंध सुधरावावेत असे म्हटले होते. दरम्यान, यावेळी काश्मीर हा पाकिस्तानचा मुद्दा असल्याचे म्हटले असून दहशतवादाच्या मुद्द्याबद्दल कोणताही उल्लेख केलेला नाही.(पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेत आल्यास शांततेवर चर्चा होईल: इम्रान खान)
तर 2018 मध्ये सुद्धा मोदी यांना इमरान खान यांनी पत्र लिहिले होते. त्यामध्ये दहशतवादाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करु असे इमरान खान यांनी मोदींना लिहिलेल्या पत्रात म्हटले होते.