'हिंदू समुदायाला होळीच्या शुभेच्छा', पाकिस्तान पंतप्रधान इमरान खान यांचे हे खास ट्विट
इमरान खान (File Photo: IANS)

आज, 9 मार्च रोजी भारतासह जिथे जिथे भारतीय व्यक्ती निवास करतायत तिथे सर्वत्र होळीचा (Holi 2020)  उत्साह पाहायला मिळत आहे. या निमित्ताने होळीच्या शुभेच्छांचा सोशल मीडियावर अक्षरशः वर्षाव होत आहे. अशातच पाकिस्तानचे (Pakistan)  बहुचर्चित पंतप्रधान इमरान खान (Imran Khan) यांनी सुद्धा आपल्या ट्विटर अकाउंट वरून होळीच्या शुभेछा देणारी एक खास ट्विट केले आहे. पाकिस्तानातील समस्त हिंदू समुदायाला होळीच्या शुभेच्छा असा आशयाचे इमरान खान यांचे ट्विट आहे. "आनंदी व शांतीपूर्ण होळीसाजरी करा, रंगाचा उत्सव असलेल्या होळीच्या हिंदू समुदायाला खूप खूप शुभेच्छा,” असं इम्रान खान यांनी ट्विट मध्ये म्हटलं आहे.Happy Holi 2020 Wishes: होळी च्या शुभेच्छा देणारे मराठमोळे Messages, Greetings, Whatsapp Status, Facebook Images शेअर करुन साजरा करा रंगांचा, आनंदाचा हा धम्माल सण! 

इम्रान खान यांच्या या ट्विटवर अनेकांनी प्रतिक्रिया देताना त्यांना ट्रोल केले आहे, पाकिस्तानात हिंदू शिल्लकच किती आहेत, अल्पसंख्यांकांवर तुमच्या देशात अत्याचार होत आहेत आणि दुसरीकडे पंतप्रधान अशा शुभेच्छा देतायत याचा काय अर्थ? असे सवाल इमरान खान यांच्या त्ववेतेवर नेटकऱ्यांकडून करण्यात आले आहेत.

पहा इमरान खान यांचे ट्विट

दरम्यान, होळी सण हा जरी मुळात भारतीय सण अस ला तरी आज जगभरात या सणामुळे सुद्धा देशाची ओळख आहे, काही दिवसांपूर्वी जेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे भारत दौऱ्यावर आले होते, त्यावेळेस त्यांनी सुद्धा या होळीचा विशेष उल्लेख करून देशवासियांना ऍडव्हान्स मध्ये शुभेच्छा दिल्या होत्या, त्यापाठोपाठ आता पाकिस्तान कडून सुद्धा अशा शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.