पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान बहरीन देशाच्या सर्वोच्च नागरिक पुरस्काराने सन्मानित
Pakistan Prime Minister Imran Khan | (File photo)

पाकिस्तानचे पंतप्रधान (Pakistan) इमरान खान (Imran Khan) यांना सोमवारी, 16 डिसेंबर रोजी बहरीन देशाचा सर्वोच्च नागरिक पुरस्कार 'किंग हमाद ऑर्डर ऑफ रेनेसां' देऊन सन्मानित करण्यात आले. बहरीनचे शाह हमाद बिन ईसा अल-खलीफा यांनी काल आपल्या महालात इमरान खान यांचे स्वागत केले व त्यांनतर इमरान आणि शाह यांच्यात दोन्ही देशातील द्विपक्षीय मुद्द्यांवर तसेच जागतिक विषयावर चर्चा झाली. प्राप्त माहितीनुसार, शाह यांच्या निमंत्रणानंतर इमरान काल बहरीन येथे गेले होते. बहरीनच्या राष्ट्रीय दिवस कार्यक्रमात त्यांनी मुख्य पाहुणे म्हणून सहभाग घेतला.

इमरान यांनी बहरीन मध्ये प्रतिनिधिमंडळ स्तरावरील चर्चांमध्ये सहभाग घेतला होता. यामध्ये प्रामुख्याने आर्थिक मुद्द्यांवरून दोन्ही देशात सुरु असणाऱ्या समस्यां आणि यावर करता येणारी उपाययोजना यावरून चर्चा झाल्याचे समजते. या व्यतिरिक्त बहरीन आणि पाकिस्तान यांच्यातील शैक्षणिक, वैज्ञानिक विश्लेषण, खेळ आणि मेडिकल क्षेत्र, विभागांमध्ये अंतर्गत सहकार्य वाढवण्यासाठी एक विशेष MOU वर स्वाक्षरी करण्यात आली आहे.

पाकिस्तानमध्ये पंतप्रधान इम्रान खान यांचा कर्जे घेण्याचा नवा विक्रम; परदेशातून आतापर्यंत घेतले 'इतके' ट्रिलियन

दरम्यान, यापूर्वीच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील 'किंग हमाद ऑर्डर ऑफ रेनेसां' या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.