पाकिस्तानातील पायलटचा प्रवासदरम्यान विमान उडवण्यास नकार, 'असे' उत्तर दिल्याने भडकले प्रवासी
Flight | Representational Image (Photo Credits: Pixabay)

Pakistan: पाकिस्तानातील एका पायलटने सऊदी अरेबियाची राजधानी रियाद येथून एक विमान इस्लामबाद येथे घेऊन जाण्यास नकार दिला. पायलटच्या या नकारामागील कारण अत्यंत थुकरट असून त्याने उत्तर देत असे म्हटले की, कामाची वेळ संपल्याने तो विमानाचे उड्डाण करणार नाही.(Boris Johnson Booze Party: इंग्लंडमध्ये Covid-19 चा हाहाकार; नियम धुडकावून पंतप्रधान बोरिस जॉन्सन करत होते दारू पार्टी)

पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सच्या पायलटने विमान हे प्रवासाच्या दरम्यानच उडवण्यास नकार दिला. त्याच्या या वागणूकीमुळे विमानातील प्रवासी संतापत आम्ही खाली उतरणार नाही असे म्हटले. द एक्सप्रेस ट्रिब्युटन यांच्या मते, PIA प्रशासनाने म्हटले की, पीके-9754 ने सऊदी अरेबियाची राजधानी रियाद येथून उड्डाण केले. पण वातावरण बिघडल्याने विमान दम्मम येथे लँन्ड करण्यात आले. त्याचवेळी पायलटने विमान इस्लामबाद येथे घेऊन जाण्यास नकार दिला आणि माझी ड्युटी संपली असे तो म्हणाला.(Pakistan: हिल स्टेशनवर बर्फाचा आनंद लुटण्यासाठी आलेल्या पर्यटकांसाठी कार बनली 'कबर', थंडीमुळे 16 जणांचा मृत्यू)

पायलच्या या वागण्यामुळे प्रवासी संतप झालेच पण परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी विमानतळावरील सिक्युरिटी बोलवाली लागली. PIA च्या प्रवक्त्यांनी असे म्हटले की, विमान उड्डाणापूर्वी पायलट यांनी पुरेसा आराम करणे गरजेचे आहे. त्यानुसारच व्यवस्था केली जाते. तर प्रवासी रात्री 11 वाजता इस्लामबाद येथे उतरणार होते. यापूर्वी पाकिस्तानच्या सरकारकडून सऊदी अरेबियासाठी थेट विमानाची सेवा सुरु करण्यात आली नव्हती. पण नोव्हेंबर मध्ये त्यांनी ती सुरु केली. प्रवक्त्यांच्या नुसार, PIA ची उड्डाणे इस्लामाबाद, कराची, लाहौर, मुल्तान आणि पेशावरसह पाकिस्तानातील विविध शहरात रवाना होणार आहेत.