प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-Facebook)

पाकिस्तानातील रहीमयारखान मधील खानपुर येथे पाकिस्तानी हिंदूंनी भोग शरीफ येथे जमावाकडून गणपतीचे मंदिर तोडण्यासह आग लावल्याप्रकरणी जबरदस्त आंदोलन केले. या आंदोलनात विविध ठिकाणातील शेकडो लोकांनी सहभाग घेतला होता. आंदोलनकर्त्यांनी असे म्हटले की, पाकिस्तानात राहणे मुश्किल झाले आहे. रोज कुठे ना कुठेतरी मंदिर तोडले जात आहे. देव-देवतांचा अपमान केला जात आहे. ऐवढेच नव्हे तर आमच्या मुलींचे अपहरण करत त्यांचे जबरदस्तीने धर्म परिवर्तन करुन लग्न लावून दिले जात आहे. आंदोलकांनी आंदोलनादरम्यान जय श्री रामच्या घोषणा सुद्धा केल्या.

लोकांनी मागणी केली की, पाकिस्तानात राहण्याचा त्यांना अधिकार द्यावा. आमच्यासाठी खुप काही गोष्टी बोलल्या जाता. पण खरे तसे काही होतच नाही. आमच्याकडे पाकिस्तानात काहीच अधिकार नाहीत. आम्ही संपूर्ण जगाला आमच्यासोबत होणाऱ्या अन्याया बद्दल सांगू इच्छितो. आम्ही आर्मी चीफ बाजवा आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांना अपील करतो की, दोषींना कठोर शिक्षा द्यावी.(धक्कादायक! 18 वर्षांच्या दोन जुळ्या बहिणींची गोळी घालून निर्घृण हत्या; इन्स्टाग्रामवर केले हत्याकांडाचे Live Telecast)

यापूर्वी पाकिस्तानातील लाहौर मधील समाज सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष चमन लाल यांनी सुद्धा मंदिर तोडण्याच्या घटनेवर पाकिस्तानी हिंदू नेत्यांवर टीका केली होती. त्यावेळी त्यांनी म्हटले की, असे काही घडले तेव्हा ते आम्ही वाद मिटवला असे म्हणतात. मात्र आम्ही हे कधीपर्यंत सहन करत राहू असे ही त्यांनी म्हटले आहे.

मंदिर तोडण्याच्या घटनेच्या कारणावरुन जे काही प्रकरण झाले त्यामध्ये एका मुलाच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला. मात्र मलगा कोण होता ते माहिती नाही. तरी सुद्धा एक आठ वर्षाच्या मानसिक रुपात अपंग हिंदू मुलाला पोलिसांनी पकडून नेले. मात्र कोर्टाने त्याला दुसऱ्याच दिवशी जामिन दिला.

या प्रकरणी इमरान खानच्या सरकारने हिंदू खासदार जय प्रकाश उकरानी यांनी मंदिराची तोडफोज केल्याच्या घटनेचा विरोध केला. त्यांनी असे म्हटले की, ही घटनेमधील प्रकार सहन केला जाणार नाही. हा देश सर्वांचा आहे. येथे हिंदू-मुस्लिम, सिख सर्वजण सारखे आहेत. त्यामुळे अशा पद्धतीची घटना आम्ही होऊ देणार नाही. त्यांनी दावा केला की, या प्रकरणी आता परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे.