Pakistan Fuel Crisis: पाकिस्तानची सरकारी विमान कंपनी PIA झाली दिवाळखोर; इंधन नसल्याने तब्बल 48 उड्डाणे रद्द
Flight Representational image. (Photo Credits: Pexels)

पाकिस्तानची (Pakistan) आर्थिकदृष्ट्या स्थिती अतिशय खराब असल्याच्या दाव्यांदरम्यान, देशात इंधनाच्या उपलब्धतेचे संकट उभे राहिलेले दिसते. विशेषत: देशाची अपयशी राष्ट्रीय विमान कंपनी पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्स (PIA) ला  याचा फटका बसत आहे. पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सची विमाने थकीत रक्कम न भरल्यामुळे आणि इंधन पुरवठ्यावरील निर्बंधांमुळे ग्राउंड करण्यात आली आहेत. पीआयएची अनेक उड्डाणे रद्द होत आहेत. इंधनाच्या अनुपलब्धतेमुळे गेल्या दोन दिवसात देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय दोन्ही मार्गांसह 48 उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.

पीआयएच्या प्रवक्त्याने पाकिस्तानी न्यूज आउटलेट द डॉनला सांगितले की, मर्यादित इंधन पुरवठा आणि दैनंदिन उड्डाणांसाठी कार्यरत समस्यांमुळे उड्डाणे रद्द करण्यात आली. प्रवक्त्याने सांगितले की, काही फ्लाइट्सचे डिपार्चर वेळापत्रक बदलण्यात आले आहे. साधारण 13 देशांतर्गत उड्डाणे आणि त्यातील 11 आंतरराष्ट्रीय मार्गावरील उड्डाणे इंधन उपलब्ध नसल्यामुळे रद्द करण्यात आली आणि इतर 12 उड्डाणे उशिरा झाली.

रद्द झालेली आंतरराष्ट्रीय विमाने दुबई, मस्कत, शारजाह, अबुधाबी आणि कुवेतला जाणार होती. पीआयएच्या म्हणण्यानुसार, रद्द झालेल्या फ्लाइटमधील प्रवाशांना पर्यायी फ्लाइटमध्ये हलवण्यात आले. या निर्णयानंतर प्रवाशांना त्यांच्या फ्लाइटची स्थिती तपासण्यासाठी विमानतळावर पोहोचण्यापूर्वी पीआयए कस्टमर केअर, पीआयए कार्यालये किंवा त्यांच्या ट्रॅव्हल एजंटशी संपर्क साधण्याचा सल्ला दिला आहे.

बुधवार (आज) साठी, पीआयएने 16 आंतरराष्ट्रीय आणि 8 देशांतर्गत उड्डाणांसह डझनहून अधिक उड्डाणे रद्द केली, तर काही उड्डाणे उशीर होण्याची अपेक्षा होती. बुधवार (आज) साठी, पीआयएने 16 आंतरराष्ट्रीय आणि 8 देशांतर्गत उड्डाणांसह डझनहून अधिक उड्डाणे रद्द केली, तर काही उड्डाणे उशिरा होण्याची अपेक्षा होती. कंपनीची स्थिती इतकी बिकट आहे की, परिस्थिती विमाने पुढे उड्डाण करणार की नाही हेही ठरवलेले नाही.