
पाकिस्तानी सेना प्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांनी 14 दहशतवाद्यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आल्याचे सांगितले आहे. पाकिस्तानी सेनेच्या मीडिया इकाई इंटर सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्सने सांगितले की, न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार 8 जणांना तरुंगात पाठवण्यात आले. सशस्त्र सेना आणि कायदा प्रवर्तन एजन्सींवर हल्ला करण्याव्यतिरिक्त निर्दोष नागरिकांची हत्या करणे, पाकिस्तानी संस्था आणि पाकिस्तानी टूरिज्म डेव्हलपमेंट कॉरपोरेशन हॉटेलवर हल्ला केल्याचा या दहशतवाद्यांवर आरोप आहे.
त्यांनी 22 लोकांना मारले असून त्यात 3 नागरिक, 19 सुरक्षादलातील सदस्य आहेत. तर 23 जण जखमी झाले आहेत.
या दहशतवाद्यांवर विशेष सैन्य न्यायालयात खटला चालवण्यात आला असून त्यांनी गुन्हाची कबुली दिली आहे, वृत्तसंस्था सिन्हुआने सांगितले.