पाकिस्तानचे (Pakistan) पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांनी घोषणा केली आहे की, इस्लामाबाद (Islamabad) आणि ताशकंद (Tashkent- उझबेकिस्तानची राजधानी) पहिला मुघल शासक जहीरुद्दीन बाबरवर (Zaheer ud din Babar) चित्रपट बनवणार आहेत. याद्वारे दोन्ही देशांमधील समान वारसाबाबत युवकांना शिक्षित करता येईल, असा उद्देश आहे. उझबेकिस्तानचे अध्यक्ष शावकत मिर्झीयोयेव (Shavkat Mirziyoyev) यांच्यासमवेत संयुक्त पत्रकार परिषदेत इम्रान खान म्हणाले की, 'महान मुघलंपैकी पहिले जहीरुद्दीन बाबरवर चित्रपट बनवण्याचा आम्ही आता निर्णय घेतला आहे व ही बाब दोन्ही देशांसाठी फारच रोमांचक आहे.'
पंतप्रधान म्हणाले, बाबरच्या घराण्याने 300 वर्षे भारतावर राज्य केले, जेव्हा भारत हा जगातील सर्वात श्रीमंत स्थानांपैकी एक मानला जायचा. खान पुढे म्हणाले की, मला वाटते की उझबेकिस्तान आणि पाकिस्तानच्या तरूणांना शेकडो वर्षांपासून जगाच्या या भागाच्या आणि जगाच्या आपल्या भागाच्या दरम्यान अस्तित्त्वात असलेल्या संबंधांबद्दल माहित असले पाहिजे. हा चित्रपट आणि मिर्झा गालिब, अल्लामा इक्बाल आणि इमाम बुखारी यांच्यावर तयार होणारे चित्रपट दोन्ही देशांतील लोकांना एकमेकांशी जोडतील. (हेही वाचा: पाकिस्तानमध्ये अफगाणच्या राजदूतांच्या मुलीचे अपहरण, दोन तास त्रास दिल्यानंतर केली सुटका)
पाकिस्तानी पंतप्रधान म्हणाले, 'आम्हाला आशा आहे या गोष्टीमुळे दोन्ही देशांमधील सांस्कृतिक देवाणघेवाणची सुरूवात होईल. आमचे देश जसजसे जवळ येतील तसतसे मी उझबेकिस्तानच्या लोकांना क्रिकेटची ओळख करुन देईन.' त्याच वेळी अध्यक्ष मिर्झीयोयेव यांनी इम्रान खान यांच्या मुद्याचे समर्थन केले आणि दोन्ही देशांमधील तरुणांना बाबरच्या काळाशी संबंधित असलेली संस्कृती जाणून घेणे आवश्यक असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, इस्लामाबादमध्ये मशिदी, समाधी आणि शाळा या त्या देशाच्या पूर्वजांनी बनविल्या आहेत हे देशातील फारच थोड्या तरुणांना माहिती आहे.
उझबेकिस्तानचे अध्यक्ष म्हणाले, 'आम्ही असे म्हणू शकतो की ही केवळ एक सुरुवात आहे. आमच्या पूर्वजांची निशाणी असलेली अनेक ठिकाणे पाहण्यासाठी मी पाकिस्तानला जाण्याची उत्सुक आहे. दरम्यान, व्यापार वाढविण्याच्या उद्देशाने उझबेकिस्तान, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यात रेल्वे प्रकल्प तयार केला जात आहे.