Coronavirus (Photo Credits-Twitter)

Omicron: ओमिक्रॉनच्या रुग्णांमध्ये सध्या झपाट्याने वाढ होत आहे. आतापर्यंत 89 देशात ओमिक्रॉनने शिरकाव केला आहे. बहुतांश युरोपिन देशात ही ओमिक्रॉनचे संक्रमण होताना दिसून येत आहे. अशातच संक्रमणामुळे रुग्णांमध्ये होणारी वाढ पाहता ही नवी लाट असल्याचे बोलले जात आहे. याच पार्श्वभूमीवर नेदरलँडमध्ये शनिवारी ख्रिसमसपूर्वी लॉकडाउनची घोषणा करण्यात आली होती. तर ब्रिटेन मध्ये ख्रिसमस नंतर दोन आठवड्यांचा लॉकडाउन लागू करण्याचा विचार केला जात आहे. जर्मनीसह फ्रान्स मध्ये ही या नव्या वेरियंटच्या विरोधात लढण्यासाठी कठोर नियम लागू करण्यास सुरुवात केली आहे.

ब्रिटेनमध्ये कोविडची चिंता अधिक वाढत असल्याने ख्रिसमस नंतर दोन आठवड्यांचा लॉकडाउन जाहीर केला जाण्याची शक्यता आहे. द टाइम्सनुसार, युकेचे मंत्री ख्रिमसनंतर हा निर्णय घेऊ शकतात. जेणेकरुन कोरोनाचा नवा वेरियंट ओमिक्रॉनवर नियंत्रण मिळवता येईल.(Omicron रुग्णांच्या आकडेवारीवरुन WHO ने व्यक्त केली चिंता)

Tweet:

ओमिक्रॉन झपाट्याने पसरत असल्याने इंग्लंड मध्ये कोविड19 चे प्रमाणपत्र, थिएटर आणि सिनेमाघरांसह बहुतांश सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे अनिवार्य करण्यात आले आहे. शनिवारी ब्रिटेनमध्ये कोरोनाची 90,418 प्रकरणे समोर आली आहेत. यापैकी 10 हजार जणांना ओमिक्रॉनची लागण झाली आहे.