Trash Balloons War: उत्तर कोरियाने अधिक कचरा भरलेले फुगे दक्षिण कोरियाच्या दिशेने पाठवले; 350 फुगे असल्याचा सैन्याचा दावा

Trash Balloons War : उत्तर कोरियाने मोठया प्रमाणात कचरा भरलेले फुगे दक्षिणेकडे पाठवले आहेत. दक्षिण कोरिया सोलच्या सैन्याने मंगळवारी त्याबाबतची माहिती दिली. सीमा भागात टिट-फॉर-टॅट अमलात आणून दक्षिण कोरियाने प्रचार मोहिमेला सुरुवात केली आहे. त्याचा बदला म्हणून उत्तर कोरियाने पुन्हा फुगे पाठवले असल्याचे सांगितले जात आहे. सोलच्या जॉइंट चीफ ऑफ स्टाफने सांगितल्या प्रमाणे, प्योंगयांगमधून सोमवारी संध्याकाळी सुमारे 350 फुगे लाँच करण्यात आले. यातील सुमारे 100 फुगे दक्षिणेकडे, मुख्यतः उत्तर ग्योन्गी प्रांत आणि राजधानी सोलमध्ये उतरले आहेत.(हेही वाचा: Trash Balloons War: दक्षिण कोरिया सीमाभागात लाउडस्पीकर प्रसारण मोहीम राबवणार; फुग्यांमधून कचरा फेकणाऱ्या उत्तर कोरियाला प्रत्युत्तर)

फुग्यांशी जोडलेल्या पिशव्यांमध्ये बहुतेक कागदाचा कचरा होता. सैन्याने सांगितले की, त्यांच्या विश्लेषणानुसार त्या फुग्यामुळे जनतेला सुरक्षेचा कोणताही धोका नाही. 'सर्व काही उत्तर कोरियाच्या कृतींवर अवलंबून आहे, दक्षिण कोरियाचे सैन्य ताबडतोब उत्तर देण्यास सज्ज आहे,' असे सोलच्या जॉइंट चीफ ऑफ स्टाफने म्हटले.

दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष यून सुक येओल यांनी कोरियन युद्ध सुरू झाल्याच्या वर्धापनदिनानिमित्त केलेल्या भाषणात उत्तरेकडून कचरा वाहून नेणाऱ्या फुग्यांच्या घटनानंना 'घृणास्पद आणि तर्कहीन चिथावणीखोर' असल्याचे म्हटले आहे.

प्योंगयांगने यापूर्वीच दक्षिणेकडे कचरा वाहून नेणारे एक हजाराहून अधिक फुगे पाठवले आहेत. प्रत्युत्तरादाखल, सोलने लष्करी कराराकडे दुर्लक्ष करत सीमेवर लाऊडस्पीकरवरून काही प्रचार प्रसारण सुरू केले.