World Food Programme wins Nobel Peace Prize 2020 (Photo Credits: Nobel Twitter)

Nobel Peace Prize 2020 Winner: नोबेल पुरस्कारांच्या यादीमधील Nobel Peace Prize बद्दल बरीच उत्सुकता होती. अखेर आज (9 ऑक्टोबर) त्याची घोषणा करण्यात आली आहे. यंदा जागतिक अन्न उपक्रम (World Food Programme)हे नोबेलच्या शांतता पुरस्काराचे मानकरी ठरले आहे. दरम्यान नॉर्वेरियन नोबेल कमिटीने काही वेळापूर्वीच विजेत्याची घोषणा केली आहे. यंदा नोबेलच्या शांतता पुरस्काराच्या यादीमध्ये सुमारे 318 उमेदवार होते. यामध्ये 211 वैयक्तिक तर 107 संस्थांचा समावेश होता.

यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार अन्न उपक्रम (World Food Programme)ला देताना या संस्थेने जगाचे लक्ष अन्नावाचून राहणार्‍या लोकांकडे आणि या समस्येकडे वेधलं आहे. दरम्यान कोविड 19 या जागतिक आरोग्य संकटाच्या काळातही अनेकांनी अन्न-पाण्यावाचून लोकांचा जीव जाऊ नये म्हणून विशेष काम हाती घेतले होते यामध्ये जागतिक अन्न उपक्रमाचादेखील समावेश होता. Nobel Prize in Chemistry 2020: यंदाचा रसायनशास्त्रातला नोबेल पुरस्कार Emmanuelle Charpentier आणि Jennifer A. Doudna यांना Genome Editing साठी जाहीर

दरम्यान आज पुरस्कार जाहीर करताना, 'युद्ध-संघर्षग्रस्त भागामध्ये शांततेची परिस्थिती बनवण्यासाठी आणि उपासमारीला रोखण्यासाठी संयुक्त राष्ट्राच्या या जागतिक अन्न उपक्रमाने मोलाची कामगिरी बजावली आहे.' त्यानिमित्तानेच हा गौरव करण्यात आला आहे.

स्वीडनचे शास्त्रज्ञ अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ दरवर्षी 10 डिसेंबर दिवशी मेडिसिन सह भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, साहित्य, शांती आणि अर्थशास्त्र या क्षेत्रात उल्लेखनीय आणि समाज उपयोगी कामगिरी करणार्‍या मान्यवरांचा गौरव केला जातो. या पुरस्कारासाठी मागील काही दिवसांपासून नियमित एका पुरस्काराची घोषणा केली जात आहे.