No Taxi for women without Burqas: बुरखा नाही तर महिलांना टॅक्सीही नाही, तालिबानचा फतवा
Burqa | Representational image (Photo Credits: pxhere

Afghan Women And Burqas: तालिबान सरकार आल्यापासून अफगानिस्तानमधील महिलांची काहीशी अधिकच हालाकीची झाली आहे. तालिबान दररोज नवा फतवा काढून महिलांना जेरीस आणत आहे. महिलांना शिक्षण आणि सार्वजनिक ठिकाणी वावरण्यासाठी नियमावली लादल्यावर आता तालीबानने पुन्हा एकदा नवा फतवा जारी केला आहे. ज्यामध्ये म्हटले आहे की, अफगान महिलांना बुरखा घातल्याशिवाय वाहन चालवता येणार (No Taxi for women without Burqas) नाही. तसेच, महिलांना वाहनचालक सोडून पुढच्या सीटवरही बसता येणार नाही.

एखाद्या वाहन चालकाने एखाद्या महिलेला घेऊन प्रवास केला आणि त्या महिलेने जर बुरखा घातला नसेल तर त्याचे वाहन जप्त करण्यात येईल, असाही नियम करण्यात आला आहे. एका वहान चालकाला बुरखा न घातलेल्या महिलेला आपल्या वाहनातून प्रवास करु दिल्याबद्दल एका वाहन चालकाला मारहाण केल्याची घटनाही घडल्याचे वृत्त डीडब्ल्यू डॉट कॉमने दिले आहे.

अफगानिस्तानातून नाटो फौजा परत गेल्यानंतर तालिबानने सत्तेची सूत्रे हाती घेतल्याला आता जवळपास दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. असे असले तरी अफगान महिलांचा तालिबानला विरोध सुरुच आहे. अनेक महिला रस्त्यांवर बुरख्याशिवाय फिरतात आणि आपला विरोध दर्शवतात. आपल्या धार्मिक परंपरांचा महिलांनी आदर करावा त्यासाठी महिलांनी बुरका घालावा, असा फतवा तालिबान नेता हिबतुल्ला अखुंदजादा याने काढला होता.

तालीबान ऑगस्ट 2021 मध्ये तालिबान अफगानिस्तानमध्ये सत्तेवर आला. सत्तेवर नव्यानेच आला तेव्हा तालीबानने महिलांचा आदर करण्याचे वचन दिले होते. मात्र, अल्पावधीतच तालिबानने आपले दात दाखविण्यास सुरुवात केली. तालिबानने हळूहळू महिलांवरील बंधने अधिक वाढवली. त्यांना विद्यापीठे किंवा उच्च शिक्षण संस्थांमध्ये जाण्यापासून प्रतिबंधित करण्यात आले आहे. इतकेच नव्हे तर ब्युटी पार्लर, सलूनवर बंदी घालण्यात आली. ज्या महिला अजूनही त्यांचे चेहरे दाखवण्याचे धाडस करतात त्यांच्यासाठी दबाव वाढत आहे.