सिरियात दहशतवादी हल्ल्यात नऊ जणांचा मृत्यू
सिरिया दहशतवादी हल्ला ( फोटो सौजन्य- ट्विटर )
सिरियामध्ये दहशतावाद्यांनी अलेप्पो शहरात  क्लोरिन हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्लामध्ये नऊ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत.
दहशतवाद्यांनी अलेप्पो येथे केलेल्या रासायनिक हल्ल्यामुळे नागरिकांना श्वास घेण्यास त्रास होत आहे. तर क्लेरिनच्या विषबाधेमुळे आता पर्यंत नऊ जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर येत आहे. तसेच सिरियाच्या सैन्यदलाकडू दहशतवाद्यांच्या तळावर हल्ला करण्यास सुरुवात केली आहे. अलेप्पोचे गव्हर्नर हुसेन दियाब यांनी जखमींची संख्या वाढत असल्याचे सांगितले आहे. आतापर्यंत 55 जखमींचा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

सिरियाच्या सैनिकांनी 2016 मध्ये अलेप्पो शहराची दहशतवाद्यांच्या तावडीतून सुटका केली होती. मात्र पुन्हा दहशतवद्यांनी अलेप्पोवर रासायनिक हल्ला करण्यास सुरुवात केली आहे.