New York Subway Shooting: न्यूयॉर्क सबवे स्टेशनवर अंदाधुंद गोळीबार; अनेकजण जखमी, तपास सुरु
New York Subway Shooting (संग्रहित संपादित प्रतिमा)

न्यूयॉर्कमधील (New York) ब्रुकलिन येथील 36 व्या स्ट्रीट सबवे स्टेशनवर मंगळवारी सकाळी एका हल्लेखोराने लोकांवर गोळीबार (Shooting) केला. या दुर्घटनेत अनेकांना गोळ्या लागल्याचे शहराच्या अग्निशमन विभागाने म्हटले आहे. या अपघातात 13 जण जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला आहे, मात्र याबाबत अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य समोर आलेले नाही. शहरातील अग्निशमन विभागाने परिसरातील वाहतूक बंद केली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन थोड्याच वेळात याबाबत पत्रकार परिषद घेणार आहेत.

अग्निशमन विभागाच्या म्हणण्यानुसार, सकाळी अचानक न्यूयॉर्क शहरातील सनसेट पार्कच्या 36 व्या स्ट्रीट स्टेशनवर धूर आल्याची माहिती मिळाली. या ठिकाणी गोळीबार झाला होता. या गोळीबाराचे कारण अद्याप समजू शकले नसले नाही. परिसरातील एका छायाचित्रात भुयारी स्टेशनवर लोक रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसत आहेत. या भागातील पोलीस विभागाने सांगितले की, भुयारी मार्गातून कोणताही स्फोट झालेला नाही. पोलीस तेथे उपस्थित लोकांकडून माहिती गोळा करत आहेत जेणेकरून गोळीबाराचे कारण कळू शकेल.

एनबीसी न्यूयॉर्कच्या मते, सूत्रांनी सांगितले की, एका व्यक्तीने ब्रुकलिन सबवे स्टेशनवर एक डिव्हाईस फेकले आणि अंदाधुंद गोळीबार केला. वरिष्ठ अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार, गॅस मास्क आणि केशरी कपडे घातलेल्या सुमारे 5 फूट 5 इंच उंच आणि 180 पौंड वजनाच्या व्यक्तीने अनेक जणांवर गोळ्या झाडल्या होत्या. तो घटनास्थळावरून पळून गेला असून तो पकडला गेला नाही. (हेही वाचा: चीन पुरस्कृत हॅकर्सकडून लद्दाख परिसरातील वीज केंद्रे लक्ष्य- रिपोर्ट)

अग्निशमन विभागाने न्यूयॉर्कवासीयांना या भागात जाण्याचे टाळण्यास सांगितले आहे. 59 वी स्ट्रीट ते अटलांटिक अव्हेन्यू पर्यंत एन/आर लाईनवर वीज बंद करण्यात आली होती. दरम्यान, या वर्षी न्यूयॉर्क शहरात गोळीबाराचे प्रमाण वाढले आहे. जानेवारीमध्ये महापौर एरिक अॅडम्स यांनी पदभार स्वीकारल्यापासून हिंसक बंदुकीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. पोलीस विभागाच्या आकडेवारीनुसार, 3 एप्रिलपर्यंत गोळीबाराच्या घटना 260 वरून, गेल्या वर्षीच्या याच कालावधीत 296 पर्यंत वाढल्या आहेत. 2018 आणि 2019 मध्ये बंदुकीच्या हिंसाचारात ऐतिहासिक घट झाली आहे आणि हे शहर मागील वर्षांच्या तुलनेत अजूनही सुरक्षित आहे.