New York Community Bank: जागतीक मंदीचे सावट! आणखी एक बँक बुडण्याच्या मार्गावर? NYCB बद्दल उलटसुलट चर्चा
New York Community Bank | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

Recession 2024: तीन मध्यम आकाराच्या यूएस बँकांच्या पतनानंतर सुमारे एक वर्षानंतर प्रादेशिक बँकिंग क्षेत्रात पुन्हा अस्थिरतेची चिन्हे दिसू आहेत. ज्यामुळे गुंतवणूकदार आणि नियामक सावधगिरीच्या पवित्र्यात आहेत. अस्थिरतेच्या चर्चेला कारण ठरली आहे ती, न्यूयॉर्क कम्युनिटी बँक (New York Community Bank). जी ) तिच्या रिअल इस्टेट कर्जावरील महत्त्वपूर्ण नुकसानानंतर कोसलण्याच्या संभाव्य सर्वोच्च शिखरावर पोहोचल्याची चर्चा आर्थिक वर्तुळात सुरु झाली आहे. एनवायसीबीच्या (NYCB) अलिकडील नुकसानीनंतर त्याचे पर्यावसन तिच्या समभगांच्या किमती घसरण्यामध्ये झाले. बँकेच्या शेअरच्या किमतीत तब्बल 60% घसरण झाल्यामुळे गुंतवणूकदार आणि इतिहासात घडलेल्या आर्थिक घरणीच्या आठवणींना उजाळा देत आहेत. परिणामी NYCB सध्या मोठ्या आर्थिक संकटाला तोंड देत असल्याचे आता जवळपास निश्चित झाले आहे.

न्यूयॉर्क कम्युनिटी बँकेने खरेदी केली सिग्नेचर बँक

अलिकडील काही वर्षांमध्येच जगभरात प्रभाव टाकू शकतील अशा अनेक बँका बुडाल्या. ज्यामध्ये सिग्नेचर बँकेचाही समावेश होता. त्या काळात बुडत असलेल्या सिग्नेचर बँकेला न्यूयॉर्क कम्युनिटी बँकेने खरेदी केले. मात्र, पुढे केवळ 11 महिन्यांमध्येच न्युयॉर्क कम्युनिटी बँकेची अवस्थही डबघाईला आली. जी आता स्वत:च कोसळण्याच्या मार्गावर आहे. रेटींग एजन्सी असलेल्या मुडीजनेही या बँकेच्या रेटींगमध्ये मोठी घसरण केली आहे. ज्यामुळे पाठीमागील पाच दिवसांमध्ये बँकेच्या समभगांची किंमत 26.36% घसरली आहे. बँकेला एकाच महिन्यात जवळपास 60% इतके नुकसान सहन करावे लागले आहे. विद्यमान स्थितीत बँकेचे बाजारी भांडवल 302.55 कोटी डॉलरवर पोहोचले आहे.  ही बँक कोसळली तर जागतिक मंदी येण्याची अनेकांना भीती वाटते आहे. (हेही वाचा, Apple CEO Tim Cook On Layoffs: जागतिक मंदिच्या काळात टाळेबंदी हा शेवटचा उपाय)

बँकेच्या बाजारी भांडवलात घसरण

एक जानेवारीनंतर बँकेचे मार्केट कॅपीटल सात अब्ज डॉलरवरुन घसरत आले आहे. जे 1997 नंतर प्रथमच इतक्या निचांकी पातळीवर पोहोचले आहे. दरम्यान, एक दिलासादायक बाबा अशी की, बँकेची 60% मालमत्ता एफडीआयसी इन्शोरंन्समध्ये सुरक्षीत आहे. त्यामुळे बँकेच्या कठीण काळातही ती मोठ्या नुकसानीतही तरु शकते, असे बोलले जात आहे. (हेही वाचा, Europe Farmers' Protests: संपूर्ण युरोपमध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन, जाणून घ्या कारण)

NYCB समभागांच्या किमती पडल्या

अभ्यासकांनी बँकेच्या आर्थिक नुकसान आणि बुडीच्या उंबरठ्यावर असण्याचे विश्लेषण करताना म्हटले आहे की, इतक्या जुन्या आणि मोठ्या बँकेला इतक्यात मोठा झटका बसले असे दिसत नाही. मात्र, तिच्या समभागांमध्ये होत असलेली कमालीची घसरण आणि त्यातील सातत्य हे मात्र भीतीदायक आहे. पाठिमागच्या तिमाहीपर्यंत समभागांमध्ये केवळ 2% घसरण झाली होती. आता त्यात सिग्नेचर बँकेच्या अधिकग्रहनानंतर जमा झालेले भांडवल सोडून त्यात आणखी घसरण होते आहे. बँक ऑफ अमेरिकेने एका प्रतिक्रियेद्वारे म्हटले आहे की, त्यांना अधिकृत संस्थांकडून मिळालेल्या प्रतिसादानुसार, बँकेत कोणतीही असामान्य जमा दिसत नाही. दरम्यान, एनवायसीबीनेही आपल्याकडील जमा प्रवाहाबाबत अधिकृतरित्या कोणतीही माहिती दिली नाही. दरम्यान, बँक लवकरच आपला वार्षिक अहवाल सादर करण्याची शक्यता आहे. ज्यामुळे बाजारातील संभ्रम काहीसा निवळेल अशी आशा आहे. जगभरातील गुंतवणूकदार या अहवालाकडे डोळे लावून बसले आहेत.