UK मध्ये लॉकडाऊनचा नवा नियम: आपल्या घरात बाहेरच्या व्यक्ती सोबत Sex केल्यास होणार कारवाई; एकत्र राहत असलेले लोकच करू शकणार सेक्स
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: Pixabay)

कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) जगातील अनेक देशांनी लॉकडाउन (Lockdown) लागू केले. त्यानंतरही रुग्णांची संख्या कमी झाली नाही म्हणून हे लॉक डाऊन वाढवण्यातही आले. जगातील प्रत्येक देशाने लॉकडाउनसाठी स्वतःचे नियम बनवले आहेत आणि हळूहळू ते बदलले जात आहेत. आता नवीन लॉकडाऊन नियमांची घोषणा करताना ब्रिटन सरकारने (United Kingdom Government) असा निर्णय घेतला आहे की, जर एखाद्या व्यक्तीने बाहेरील व्यक्तीशी लैंगिक संबंध (Sex) ठेवले तर ते बेकायदेशीर मानले जाईल. म्हणजेच सेक्स करणाऱ्या व्यक्ती एकाच घरातील नसतील तर तो गुन्हा असेल.

सध्याच्या परिस्थितीमध्ये बरेच लोक खासगी ठिकाणी एकत्र जमू नयेत आणि कोरोना बाधित व्यक्तीशी संबंध येऊ नयेत, म्हणून हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता इंग्लंड मध्ये सेक्स करण्यासाठी समोरील व्यक्ती तुमच्या सोबत राहत असणे गरजेचे आहे. आत्तापर्यंत फक्त जी व्यक्ती दुसऱ्यांच्या घरात लैंगिक संबंध ठेवण्यासाठी जात असे, तीच गुन्हेगार ठरत होती. मात्र आता सोमवारी संसदेत सादर करण्यात आलेल्या दुरुस्ती नियमांतर्गत दोघांवरही खटला चालविला जाऊ शकतो.

नव्या कायद्यानुसार लोक कोणत्याही खास कारणाशिवाय एकमेकांच्या घरी जाऊ शकत नाहीत तसेच कोणत्याही प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन करू शकणार नाहीत. मात्र हा नियम क्रीडा व्यावसायिक, अंत्यसंस्कारात भाग घेणार्‍या लोकांना लागू होणार नाही. जर एखादा खेळाडू प्रशिक्षण घेत असेल किंवा एखाद्या स्पर्धेत भाग घेण्यासाठी तयारी करत असेल, तर तो वेगळा एकटे राहू शकतो. याशिवाय त्याचे पालक, प्रशिक्षकही वेगळ्या ठिकाणी राहू शकतात. (हेही वाचा: Avifavir औषध COVID-19 विरूद्धच्या लढाईत 'Game Changer' ठरणार रशियाचा दावा; पुढील आठवड्यापासून रूग्णांवर वापरण्यासाठी सज्ज)

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सरकारने अशा कायद्याची अंमलबजावणी केल्यानंतर, अशा लोकांना समस्येचा सामना करावा लागू शकतो जे शक्यतो घरीच मेडिकल स्टाफला बोलावून उपचार करवून घेतात. त्यामुळे आता या कायद्याची ट्विटरवरून टीका होत आहे. दरम्यान, ब्रिटनमध्ये केलेल्या अभ्यासानुसार, लॉकडाऊन दरम्यान 10 पैकी 6 जणांनी लैंगिक संबंध ठेवले नाहीत.