Nepal: पीएम केपी शर्मा ओली यांना मोठा झटका, संसदेत बहुमत सिद्ध न करता आल्याने गमावले पद
Nepal Prime Minister KP Sharma Oli | (Photo Credits: Getty Images)

नेपाळचे (Nepal) पंतप्रधान केपी शर्मा ओली (PM KP Sharma Oli) यांना संसदेच्या खालच्या सदनात बहुमत सिद्ध न करण्यास अयशस्वी ठरले आहेत. त्यामुळे नेपाळच्या संविधानाच्या आधारावर त्यांच्या हातातून पंतप्रधानांचे पद गेले आहे. पुष्पकमल दहल प्रचंड नीत नेपाळ कम्युनिस्ट पार्टी (माओवादी केंद्र) च्या ओली सरकारचे समर्थन मागे घेतल्यानंतर त्यांना लोकसभेत बहुमत सिद्ध करायचे होते. नेपाळ मध्ये सोमवारी संसदेचे विशेष सत्र बोलावण्यात आले होते.(Vladimir Putin यांचे टीकाकार Alexei Navalny यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर Alexander Murakhovsky बेपत्ता)

या दरम्यान पंतप्रधान ओली 275 सदस्यीस सदनमध्ये बहुमत सिद्ध करण्यासाठी अयशस्वी ठरले. माय रिपब्लिकाच्या मते ओली यांना फक्त 93 मते मिळाले तर त्यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी 136 मतांची गरज होती. विश्वास मतांच्या विरोधात 124 मत पडली. 15 खासदार तटस्थ होते तर 35 खासदारांना वोटिंग केलेच नाही. त्याचसोबत कलम 100(3) च्या नुसार, आपोआपच ओली PM पदापासून मुक्त झाले.(चीनचे राष्ट्राध्यक्ष Xi Jinping यांचे PM Narendra Modi यांना पत्र; कोरोना विषाणू साथीशी लढण्यासाठी देऊ केली मदत)

Tweet:

फ्लोर टेस्टपूर्वीच ओली यांना एक मोठा झटका लागला होता. तर त्यांच्या पक्षातील खासदारांच्या एका ग्रुपने सोमवारी संसदेच्या विशेष सत्रात सहभागी व्हायचे नाही असा निर्णय घेतला. पार्टीचे एक नेते भीर रावल यांनी असे म्हटले होते की, पक्षाच्या असंतुष्ट गटातील 20 हून अधिक आमदारांनी सत्रावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ओली यांना यांच्याकडून मत मिळण्याची शक्यता कमी झाली.

याआधी ओली यांनी पक्षातील असंतुष्ट गटाला घाईमध्ये कोणताही निर्णय घेऊ नका असा आग्रह केला होता. त्यांनी असे म्हटले होते की, मी सर्व खासदारांना सांगू इच्छितो की कोणताही निर्णय घाईत घेऊ नका. एकत्रित येऊन बैठक करु आणि समस्येवर तोडगा काढू. दरम्यान, ओली यांना फेब्रुवारी 2019 मध्ये कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ (माओवादी सेंटर) च्या समर्थनामुळे पंतप्रधान पद मिळाले होते.