Vladimir Putin यांचे टीकाकार Alexei Navalny यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर Alexander Murakhovsky बेपत्ता
Alexander Murakhovsky | (Photo Credits: Twitter)

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन (Vladimir Putin) यांचे प्रमुख टीकाकार एलेक्सी नवलनी (Alexei Navalny) यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर अलेक्जेंडर मुरखोव्स्की (Alexander Murakhovsky) हे बेपत्ता आहेत. एलेक्सी नवलनी यांच्यावर विषप्रयोग करण्यात आला होता. त्यांच्यावर अलेक्जेंडर मुरखोव्स्की यांनी उपचार केले होते. दरम्यान, वृत्तसंस्था आयएएनएसने वृत्तसंस्था तासने पोलिसांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्ताच्या आधारे म्हटले आहे की, अलेक्जेंडर मुरखोव्स्की यांना ओम्स्क च्या सायबेरियाई प्रांतात आरोग्यमंत्री म्हणून नियुक्त केले होते. शिखर परिषदेला गेल्यानंतर 7 मे पासून परतले नाहीत.

मॉस्कोच्या पूर्वेस सुमारे 2,200 km (1,370 miles) अंतरावर असलेल्या ओम्स्क प्रांतातील पोलिसांनी सांगीतले की, सायबेरीयन डॉक्टर अलेक्झांडर यांनी शुक्रवारी आपल्या ठिकाणाहून निघाले होते. त्यानंतर ते परत दिसलेच नाहीत. एका स्थानिक संस्थेने सुरुवातीला 1971 मध्ये जन्मलेली एक व्यक्ती बेपत्ता झाल्याचे म्हटले होते. डीपीए वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, अतिरिक्त पोलिस अधिकाऱ्यांकडे या संस्थेने पोलीसी तापासबाबत मागणी केली होती. एलेक्सी नवलनी यांना जर्मनीला नेण्यात आले होते आणि बर्लिन येथील चाराईट रुग्णालयात त्यांच्यावर काही आठवडे उपचार करण्यात आले होते. त्यांच्यावर विविध प्रकारच्या चाचण्या केल्यानंतर त्यांच्यावर नर्व एजंट नोविचोक च्या माध्यमतून विष देण्यात आल्याचे पुढे आले.

रशियाने म्हटले आहे की, एलेक्सी नवलनी यांच्यावर झालेल्या कथीत विषप्रयोग सिद्ध होऊ शकला नाही. त्यामुळे त्यांच्यावर विषप्रयोग झाल्याच्या आरोपाची चौकशी केली जाऊ शकत नाही. यूरोपीय संघ आणि अमेरिकेने वारंवार रशियाकडे या घटनेच्या चौकशीची मागणी केली आहे. मात्र, अद्याप विशेष असे काहीच घडू शकलने नाही. रशियामध्ये असे प्रतिष्ठीत आणि महत्त्वाच्या व्यक्तींचे गायब होणे नवे नाही. आजवर पुतीन यांच्यावर आणि त्यांच्या सरकारवर टीका करणारे अनेक लोक बेपत्ता झाले आहेत. अनेकदा हे लोक बेपत्ता होण्याचा आणि त्याची हत्या करण्यात आल्याचा आरोप पुतीन सरकारवर झाला आहे. मात्र, अद्याप कोणत्याही घटनेतील वास्तव पुढे येऊ शकले नाहीत.