Neolithic Temple: सऊदी अरेबियामध्ये सापडले 8,000 वर्षांपूर्वीचे पुरातन मंदिर
Neolithic Temple in Saudi Arabia | (PC - Twitter)

मुस्लिम देशांपैकी एक असलेल्या सऊदी अरेबीया (Saudi Arabia) मध्ये चक्क 8000 वर्षे जुने असलेल्या एका मंदिराचे (Neolithic Temple) अवशेष सापडले आहेत. सऊदी अरेबियाच्या पुराततत्व विभागानेच याबाबत माहिती दिली आहे. ही माहिती कळताच लोकांनी सोशल मीडियावर जोरदार प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. सऊदी प्रेस एजन्सीने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, सुऊदी अरबच्या राजधानी रियाधच्या दक्षिण-पश्चिम येथील अलफामध्ये 8000 वर्षे पुरातन मंदिराचे अवशेष मिळाले आहेत. जे एखाद्या मंदिरासारखे आहेत. वृत्तानुसार, कधी काळी अलफा येथील लोक या मंदिरात येऊन पुजा करत असावेत असेही मानले जात आहे. सोशल मीडियावर या मंदिराच्या अवशेषांची जोरदार चर्चा सुरु आहे.

आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनीही याबाबत महिती दिली आहे, सऊदी अरबच्या पुरातत्व विभागाच्या टीमने नव्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून धार्मिक केंद्राचा शोध घेतला आहे. सोबतच अलफा साईटवर घेतलेल्या शोधमध्येही मंदिराचे अनेक अवशेष आढळून आले आहेत. या सर्व पुराव्यांना, अवशेषांना जमा करुन संशोधनासाठी पाठविण्यात आले आहेत. सऊदीच्या गॅजेटनुसार अलफाचा हा महत्त्वपूर्ण परिसर पुराततत्व विभागाच्या लोकांसाठी पाठिमागी 40 वर्षांपासूनच हॉटस्पॉट राहिला आहे. (हेही वाचा, पाकिस्तान मध्ये आढळले 1300 वर्ष जुन्या भगवान विष्णू मंदिराचे अवशेष)

या मंदिराची माहिती मिळताच हेही समजते की, या प्रदेशातील लोक पूजा-अर्चांवर विश्वास ठेवत असत. या मंदिराशिवाय पुराततत्व विभागाचे पथक इतरही अनेक ठिकाणाहून माहिती गोळा करत आहे. ज्यातून पुरातन काळातील लोकांच्या सिंचनासाठी विशेष तंत्रज्ञान वापरत असल्याचेही पाहायला मिळते. संशोधन अद्यापही सुरुच आहे. संशोधनानंतरच कळणार आहे की, त्या काळात नेमके काय असू शकते.