Zaki-ur-Rehman Lakhvi. (Photo Credits: Twitter@SmritiS24856750)

लाहोरच्या अ‍ॅन्टी टेरिरिझम कोर्ट (Anti-TerrorismCourt) कडून Zaki ur Rahman Lakhvi ला 15 वर्षाच्या तुरूंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. लखवी हा मुंबईच्या 26/11 दहशतवादी हल्ल्याचादेखील मास्टरमाईंड होता. दहशतवादी कारवायांना आर्थिक रसद पुरवल्या (Terror Financing Case) प्रकरणी त्याला ही शिक्षा ठोठावण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. Zaki-ur-Rehman Lakhvi Arrested: 26/11 मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड आणि LeT ऑपरेशन्स कमांडर झाकी-उर-रहमान लखवीला पाकिस्तानमध्ये अटक: Official.

काल (7 जानेवारी) पाकिस्तानात अ‍ॅन्टी टेरेरिझम कोर्ट कडून Jaish-e-Mohammad चा प्रमुख Masood Azhar याच्याविरूद्ध देखील अटक वॉरंट काढले आहे. त्याच्यावरदेखील टेरर फायनान्सिंगचे आरोप आहे. सारख्याच आरोपाखाली आज (8 जानेवारी) Zakiur Rahman Lakhvi ला अटक करून त्याला 15 वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

2 जानेवारीला पाकिस्तानने मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड आणि Lashkar-e-Taiba चा ऑपरेशंस कमांडर लखवी याला terror financing charges मध्ये अटक असल्याचं सांगितलं होतं. Zakiur Rahman Lakhvi ला युएनने देखील दहशतवादी म्हणून जाहीर केले आहे. तो मुंबई हल्ल्याच्या केस मध्ये 2015 पासून जामीनावर बाहेर होता.

पंजाब प्रांताच्या काऊंटर टेरिरिझम डिपार्टमेंट (CTD)अटक केली. सध्या पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय स्तरातून दहशतवादी कारवायांविरूद्ध कडक भूमिका घेण्याबाबतच्या दबाव वाढत आहे. दहशतवादी कारवायांना आर्थिक रसद पुरवणार्‍याच्या कामगिरीवर लक्ष ठेवून असणारी संस्था Financial Action Task Force (FATF)पाकिस्तानला त्यांच्याकडे उघड माथ्याने फिरणार्‍या दहशतवाद्यांना चाप बसवण्यासाठी ताकीद देण्यात आली होती.