मुकेश अंबानी यांनी Asia's Richest Man यादीतील अव्वल स्थान गमावलं; Jack Ma आता पहिल्या स्थानी
Mukesh Ambani | File Image | (Photo Credits: PTI)

रिलायंस ग्रुपचे सर्वेसवा मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या नावावर असलेलं Asia's Richest Man हे बिरूद आता Alibaba's Jack Ma यांच्याकडे गेले आहे. सध्या रशिया आणि सौदी अरेबियामध्ये सुरू असलेल्या कच्च्या तेलाच्या किंमतीवरील दरयुद्धाचा सोबतच कोरोना व्हायरसमुळे मुंबई शेअर बाजारात असलेल्या निराशाजनक वातावरणाचा फटका रिलायंस इंडस्ट्रीसह मुकेश अंबानींना बसला आहे. सोमवार (9 मार्च) दिवशी गडगडलेल्या शेअर बाजारामुळे रिलायन्स इंडस्ट्रीला मागील 10 वर्षातील सर्वात मोठा फटका बसला आहे. प्रत्येकी शेअर मागे हा 1,094.95 रूपये असल्याचं समोर आलं आहे. तर Bloombergच्या रिपोर्टनुसार मुकेश अंबानी यांचं $5.8 billionचं नुकसान झालं आहे. Gold- Silver & Petrol Diesel Rate Today: सोने महागले; चांदीच्या दरात घसरण, पेट्रोल डिझेलचे भाव पुन्हा उतरले, जाणून घ्या आजचे दर.

Bloomberg Billionaires Index च्या माहितीनुसार, मुकेश अंबानी सध्या आशियातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत दुसर्‍या स्थानी आहेत. तर अलिबाबा समुहाचे Jack Ma यांच्याकडे $44.5 billion असून ते अव्वल स्थानी आहेत. दरम्यान कोरोना व्हायरसच्या दहशतीचा त्यांना फायदा झाला आहे. मनुष्याशी प्रत्यक्ष संपर्क टाळण्यासाठी क्लाऊड कम्प्युटर सर्विस ची मागणी वाढली आहे. क्रुड ऑईलचे दर घसरल्याने मात्र Reliance Industries Ltd (RIL) ला त्याचा मोठा फटका बसला आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये 31 टक्क्यांपर्यंत घसरण झाली आहे. कच्च्या तेलाच्या दरात 1991 नंतर झालेली ही सर्वात मोठी घसरण समजली जात आहे. . डिसेंबर तिमाहीमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचा जीआरएम 9.2 डॉलर प्रति बॅरल इतका होता. रिलायन्सच्या शेअर्समध्ये झालेल्या घसरणीनंतर रिलायन्सचं बाजार मूल्य 7 लाख 5 हजार 655.56 कोटी रूपयांवर आलं आहे.