Morocco Earthquake: मोरोक्को येथे शुक्रवारी प्राणघातक भुकंप झाला. या घटनेत 2,000 हून अधिक नागरिक ठार झाले आहेत. अल जझीराच्या वृत्तानुसार. 6.8 तीव्रतेच्या भूकंपचा धक्का जाणवला, या घटनेत 2,012 हून अधिक लोकांचा बळी घेतला आणि 2,059 लोक जखमी झाले आणि अनेक बेघर झाले, अधिकाऱ्यांनी शनिवारी देशात तीन दिवसांचा राष्ट्रीय शोक जाहीर केला. मोरोक्कोचा राजा मोहम्मद सहावा यांनी सशस्त्र दलांना विशेष शोध आणि बचाव पथके आणि सर्जिकल फील्ड हॉस्पिटल तैनात करण्याचे निर्देश दिले.
शुक्रवारी रात्री मोरोक्कोच्या हाय अॅटलास पर्वतरांगांना हादरवणाऱ्या भूकंपामुळे मराकेशमधील ऐतिहासिक वास्तूंचे नुकसान झाले, परंतु दक्षिणेकडील पर्वतीय प्रदेशांमध्ये अल-हौज आणि ताराउडंट प्रांतांमध्ये मृत्यूची नोंद झाली. दरम्यान, शोध आणि बचाव कार्यासाठी रस्ते मोकळे करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. भूकंप 03:41:01 (UTC+05:30) वाजता 18.5 किमी खोलीवर झाला. भूकंपाच्या तीव्रतेमुळे दक्षिणेकडील सिदी इफ्नीपासून उत्तरेकडील राबात येथे झाला.
प्रमुख आर्थिक केंद्र माराकेशच्या पश्चिमेला ७२ किलोमीटर अंतरावर भूकंपाचा केंद्रबिंदू नोंदवला गेला. अल जझीराच्या म्हणण्यानुसार, तुर्की आपत्ती आणि आपत्कालीन व्यवस्थापन विभाग (AFAD) यांनी वैद्यकीय, मदत आणि शोध आणि बचाव एजन्सीच्या दोनशे पासष्ट सदस्यांना अलर्टवर ठेवले आहे. रबतमधील अधिकाऱ्यांकडून विनंती मिळाल्यास मोरोक्कोला नेण्यासाठी एक हजार तंबू वाटप करण्यात आले आहेत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूकंपात झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला.