कराची: देशोदेशीच्या श्रीमंत व्यक्तिबाबत सर्वांनाच उत्सुकता असते. त्यात भारताचा शेजारी असलेल्या पाकिस्तानबाबत अधिक. शासन-प्रशासन आदिंबाबत अनेकदा अस्थिर असलेला हा देश. या देशाची अर्थव्यवस्थाही कशी नेहमी कुबड्या घेतलेल्या अवस्थेत. अशा परिस्थितीत या देशात किती लोक श्रीमंत असतील किंवा या देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण असेल, हाही एक उत्सुकतेचाच विषय. पण, एका व्यक्तिच्या दाव्यामुळे ही उत्सुकता काहीशी कमी झाली आहे. पाहा कोण आहे ही व्यक्ती.....
जमीनदारीमुळे श्रीमंती
पाकिस्तानच्या मोहम्मद हुसेन शेख यांचा दावा आहे की, ते मुजफ्फरगढ शहरा जवळच्या सुमारे ४०% जमीनीचे मालक आहेत. पाकिस्तानातील निवडणुकीवेळी जाहीर केलेल्या संपत्तीच्या विवरणपत्रात त्यांनी आपली संपत्ती सुमारे ४०३ कोटी रूपये असल्याचे म्हटले आहे. मोहम्मद हुसेन शेख यांचे म्हणने आहे की, शहरातील लांग मलाना, त्रिलरी, चक्र त्रिलरी आणि लकरान परिसरात त्यांची सर्वाधिक जमीन आहे. सुरुवातीला त्यांची जमीन एक वादग्रस्त प्रकरण होती. पण, आता कायदेशीर लढाई जिंकल्यानंतर ते या जमीनीचे पूर्ण मालक बनले आहेत. या जमीनी संबंधीचा खटला न्यायालयात सुमारे ८८ वर्षे सुरू होता. हुसेन NA-182 आणि PP-270 या मतदारसंघातून निवडणूक लढवली आहे.
भलेभले राजकीय नेतेही कोट्यधीश
दरम्यान, पाकिस्तानी वृत्तपत्र द डॉनने दिलेल्या वृत्तानुार, शेख यांचा दावा आहे की, ते सुमारे ४०३ कोटी रूपयांच्या जमीनीचे मालक आहेत. या जमीनीची बाजारभावातील किंमत ३०० ते ४०० कोटी रूपये आहे. त्याशिवाय त्यांच्याकडे कोट्यवधी रूपयांची संपत्तीही आहे. दरम्यान, मरियम नवाज, शरीफ, बिलावल भुत्तो जरदारी आणि असिफ अली जरदारी यांनीही आपल्याकडे कोट्यवधी रुपयांची संपत्ती असल्याचे जाहीर केले आहे. पण, या सर्वांची संपत्ती हुसेश शेख महोदयांच्या खालीच आहे.