PM Modi meeting Donald Trump at G7 Summit sidelines | (Photo Credits: ANI)

ह्यूस्टन (Huston) येथे ‘हाउडी मोदी’ (Howdy Modi) कार्यक्रमानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज (24 सप्टेंबर) रोजी न्यूयॉर्क (New York) मध्ये डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांची भेट घेऊन द्विपक्षीय चर्चा केली.यावेळी काही पत्रकारांशी ट्रम्प व मोदी यांनी संवाद साधला. अपेक्षेप्रमाणे यावेळेस एकाने पाकिस्तान पंतप्रधान इमरान खान (Imran Khan) यांचा विषय काढला, आणि काही दिवसांपूर्वी इमरान यांनी अल कायदा संघटनाला पाकीस्तानने आश्रय दिल्याची कबुली दिली होती यावर सवाल केला असता डोनाल्ड यांनी हा विषय हाताळण्यासाठी मोदी समर्थ आहेत. पंतप्रधान हे पाहून घेतील असे उत्तर दिले

याशिवाय, डोनाल्ड ट्रम्प यांनी आम्ही दोघे मिळून इस्लामिक दहशतवादा विरोधात लढा देणार आहोत, मात्र भारत आणि पाकिस्तान द्विपक्षीय चर्चेतूनच त्यांचे अंतर्गत वाद सोडवू शकतात, असे सांगितले. मोदी दहशतवादाचा मुद्दा सोडवतील असं सांगतानाच मोदींनी दहशतवादा विरोधात पाकिस्तानला मोठ्याने संदेश दिला आहे. पाकिस्तान मोदींचा हा संदेश जरूर ऐकेल अशी अपेक्षा आहे, असंही ट्रम्प म्हणाले.

ANI ट्विट

याशिवाय आजच्या चर्चेत डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदींवर कौतुकाचा वर्षाव केला, मोदी हे महान नेते आहेत त्यांना बघून राष्ट्रपित्याशीच तुलना करावीशी वाटते असेही ट्रम्प म्हणाले. (नरेंद्र मोदी यांना 'Father Of The Country' संबोधत अमृता फडणवीस यांनी दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा; नेटकऱ्यांनी दिल्या अशा प्रतिक्रिया)

दरम्यान, येत्या काळात भारतासोबत व्यापार देखील सुरवात करणार असल्याचे ट्रम्प यांनी सांगितले आहे. आश्चर्य म्हणजे याआधी ट्रम्प यांनी अनेकदा भारत व पाकिस्तान देहसातील काश्मीर प्रश्नाच्या वादात मध्यस्थी करण्याची तयारी दाखवली होती. मात्र यावेळेस त्यांनी मोदी सक्षम आहेत अशी प्रतिक्रिया दिल्याने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. तर मोदींनी देखील डोनाल्ड ट्रम्प यांचे आभार मनात  हाऊडी मोदी कार्यक्रमातील एक खास फोटो त्यांना भेट केला.