Narendra Modi 69th Birthday: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा आज (17 सप्टेंबर) वाढदिवस आहे, आज मोदींनी वयाच्या 69व्या वर्षात पदार्पण केले. राजकीय नेते मंडळींपासून ते सर्वसामान्य समर्थकांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरु आहे. अशातच काही वेळापूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी सुद्धा मोदींचे अभिष्टचिंतन केले. पण या शुभेच्छांमध्ये मिसेस मुख्यमंत्री यांचा असा काही गोंधळ झाला कि त्यानंतर पुन्हा एकदा त्यांना नेटकऱ्यांच्या ट्रोलिंगला सामोरे जावे लागले. झालं असं की, शुभेच्छा देताना अमृता यांनी मोदींना 'Father of Country' असे संबोधले. यामागे खरंतर त्यांची भावना अचूक असली तरी हा किताब महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांना दिला जातो असे म्हणत सोशल मीडियावर आता नेटकऱ्यांनी त्यांची शाळा घ्यायाला सुरुवात केली आहे.
अमृता फडणवीस यांनी ट्विट मध्ये 'Father of our Country' नरेंद्र मोदी यांच्या धडाडीने देशाच्या समाजाच्या प्रगतीसाठी काम करतात त्यामुळे आम्हाला सुद्धा प्रेरणा मिळते..असे म्हणत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.
अमृता फडणवीस ट्विट
Wishing the Father of our Country @narendramodi ji a very Happy Birthday - who inspires us to work relentlessly towards the betterment of the society ! #HappyBDayPMModiJi #HappyBdayPMModi #HappyBirthdayPM #happybirthdaynarendramodi pic.twitter.com/Ji2OMDmRSm
— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) September 17, 2019
मात्र हे ट्विट पोस्ट झाल्यावर काही क्षणातच सर्वांचे लक्ष वेधले, आणि मग काय सर्वांनीच अमृता यांना इतिहास शिकवायला सुरुवात केली. (PM Narendra Modi 69th Birthday Special: वाराणसीच्या संकट मोचन मंदिरामध्ये मोदी चाहता अरविंद सिंह कडून 1.25 किलो वजनाचा सोन्याचा मुकूट अर्पण)
पहा अशा झाल्या अमृता फडणवीस ट्रोल
Appreciate the wishes.....
But......father of our country???? There was a person revered by us Late Bapuji....and he Late Shri. MK Ghandhi ji is the Father of our nation....
There can only one father....not many....
— Mammen (@JoyMammen) September 17, 2019
Father of our Nation : mahatma Gandhi
Fav prime minister ever : Narendra modi ji
— MANAS (@dasari_manash) September 17, 2019
Father of our nation is only Mahatma Gandhi
— Sidrah (@SidrahDP) September 17, 2019
Gandhiji is the father of our country & his birthday is 2 Nd oct.
— Raju Miah (@RajuMia75227349) September 17, 2019
दरम्यान अमृता यांनी ट्विट सोबतच शेअर केलेल्या एका व्हिडिओची देखील चर्चा होत आहे. हा व्हिडीओ दिव्याज फाउंडेशन च्या पुढाकाराने सुरु झालेल्या 'मिट्टी के सितारे' या कार्यक्रमातीळ आहे. अमृता फडणवीस यांच्या कल्पनेतून तयार झालेला हा कार्यक्रम वंचित मुलांना संगीतक्षेत्रात नाव कमवण्यासाठी एक मंच निर्माण करून दिला जाणार आहे.