भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज त्यांचा 69 वा वाढादिवस साजरा करत आहेत. या दिवसाचं औचित्य साधून देश-परदेशात मोदी चाहत्यांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यामध्ये कुणी खास केक कापून तर काहींनी एकत्र जमून जल्लोषात रात्री 12 वाजताच वाढदिवस साजरा करण्यास सुरूवात केली. मात्र नरेंद्र मोदी यांच्या लोकसभा मतदारसंघ असलेल्या वाराणसीमध्ये त्यांचा एका चाहत्याने सुमारे 1.25 किलो वजनाचा सोन्याचा मुकूट मारूतीला अर्पण केला आहे. अरविंद सिंह (Arvind Singh) असं या चाहत्याचं नाव असून त्याने वाराणसीच्या संकट मोचन मंदिरामध्ये (Sankat Mochan Temple) मुकूट अर्पण केला आहे.
ANI या वृत्त संस्थेशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार, अराविंद सिंह हे नरेंद्र मोदी यांचे चाहते आहेत. मे 2019 च्या लोकसभा निवडणूकीदरम्यान जर नरेंद्र मोदी दुसर्यांदा केंद्रामध्ये सरकार स्थापन करू शकले तर भगावान हनुमानाला आपण सोन्याचा मुकूट अर्पण करू असा प्रण अरविंद सिंह यांनी केला होता. अरविंद सिंह यांची इच्छा पूर्ण झाली, नरेंड्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली मोदींनी 30 मे दिवशी केंद्रामध्ये सरकार स्थापन केलं. त्यानंतर आता नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून बर्थ डेच्या पूर्वसंध्येला (16 सप्टेंबर) अरविंद सिंह यांनी सोनेरी मुकूट अर्पण केला आहे.
ANI Tweet
Varanasi:Arvind Singh,a fan of PM Modi offered a gold crown to Lord Hanuman at Sankat Mochan Temple yesterday,ahead of PM's birthday,says,"Ahead of Lok Sabha polls, I took a vow to offer gold crown weighing 1.25 kg to Lord Hanuman if Modi ji formed govt for the second time"(16/9) pic.twitter.com/G6ephry6nC
— ANI UP (@ANINewsUP) September 17, 2019
आज नरेंद्र मोदी वाढदिवसानिमित्त गुजरात दौर्यावर आहेत. आज ते त्यांची आई हीराबेन यांची भेट घेणार आहेत. तसेच विविध आयोजित कार्यक्रमांना भेट देणार आहेत. सध्या सोशल मीडियावरही त्यांच्या जन्मदिनाचं औचित्य साधून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.