बिल गेट्सने खरेदी केले 4 हजार 600 कोटींचे आलिशान जहाज; पहा काय आहेत फिचर्स
Bill Gates buy luxury superyacht (PC- Twitter)

जगातील सर्वात श्रीमंताच्या यादीतील मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स (Microsoft Co-Founder Bill Gates) यांनी 4 हजार 600 कोटींचे आलिशान जहाज (Super yacht) खरेदी केले आहे. विशेष म्हणजे बिल गेट्स यांनी चक्क केवळ सुट्टी घालवण्यासाठी हे जहाज खरेदी केले आहे. हे जहाज लिक्विड हाईड्रोजनवर (Liquid Hydrogen) चालते. या जहाजामध्ये 45 लोकांना आरामात राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

हे आलिशान सुपर याट जवळपास 370 फूट लांब असून या जहाजात 5 डेक आहेत. विशेष म्हणजे या जहाजामध्ये जिम, योगा स्टुडिओ, ब्युटी रूम, मसाज पार्लर आणि स्विमिंग पूल बनवण्यात आले आहे. बिल गेट्स यापूर्वी सुट्टी घालवण्यासाठी भाड्याने जहाज घेत असतं. परंतु, आता त्यांनी स्वत: हे आलिशान जहाज खरेदी केले आहे. 2024 पर्यंत हे जहाज तयार होणार आहे. या जहाजापासून कोणतेही प्रदूषण होणार नसून ते इको फ्रेंडली असणार आहे. (हेही वाचा - काय सांगता..! चक्क बेडकाने सापाला खाल्लं? पाहा थरारक व्हिडिओ)

या जहाजात मनोरंजनासाठी थियटरही असणार आहे. या सुपर याटमध्ये लिक्विड हायड्रोजन भरल्यानंतर ते जवळपास 6 हजार 437 किलोमीटर पर्यंत अंतर पार करू शकते. या सुपर याटचा ताशी वेग 32 किलोमीटर इतका आहे. सध्या सोशल मीडियावर या जहाजाचे फोटो व्हायरल होत आहेत.