McDonald's मध्ये आईला थंड फ्राईज दिल्याच्या रागातून 23 वर्षीय कर्मचार्‍याची गोळ्या झाडून हत्या
(Photo Credits: Pixabay)

McDonald's च्या अमेरिकेतील न्यू यॉर्क (New York) शहरामधील आऊटलेट मध्ये 20 वर्षीय मुलाने त्याच्या आईला थंड फ्राईज दिल्याच्या रागामध्ये एकाची गोळ्या झाडून हत्या केली आहे. मृत व्यक्ती 23 वर्षीय Kevin Holloman आहे. त्याला 3 गोळ्या लागल्या आणि त्यामध्येच त्याचा मृत्यू झाला.

Michael Morgan या आरोपीवर खूनाचा आणि criminal possession of a weapon चा आरोप आहे. 21 ऑक्टोबर 2020 मध्येही त्याच्यावर अशाच प्रकारचा गुन्हा होता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. Morgan च्या आईने तिला थंड फ्राईज का दिले यावरून विचारणा सुरू करताच तोही भडकला होता. तेथील कर्मचारी हसला आणि मॅनेजरला विचारा असं म्हणाला. नंतर मंगळवारी रात्री हा प्रकार घडला. दरम्यान पोलिसांसोबत आरोपीच्या आईने जाऊन जेव्हा Morgan ची विचारपूस केली तेव्हा त्याने जे करायला हवं होतं तेच केलं आहे अशी माहिती दिली.

अमेरिकेमध्ये अशाप्रकारे गोळीबाराच्या घटना मागील काही दिवसांत वाढत असल्याचं चित्र आहे. लोकांना अशाप्रकारच्या गुन्ह्यांपासून दूर ठेवण्यासाठी आता नवं विधेयक आणलं जात आहे त्यामध्ये मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी देखील आर्थिक तरतुदीचा सरकारचा प्रयत्न आहे. हे देखील नक्की वाचा: New York Subway Shooting: न्यूयॉर्क सबवे स्टेशनवर अंदाधुंद गोळीबार; अनेकजण जखमी, तपास सुरु.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन म्हणाले होते की अमेरिकेने लहान मुले आणि कुटुंबांच्या सुरक्षेसाठी प्राणघातक शस्त्रांवर बंदी घालणे आवश्यक आहे किंवा ते खरेदी करण्यासाठी वय 18 वरून 21 पर्यंत वाढवणे आवश्यक आहे. 22 जून, दिवशी Uvalde, Buffalo आणि Texas येथे नुकत्याच झालेल्या सामूहिक गोळीबाराच्या घटनांनंतर यूएस खासदारांच्या गटाने bipartisan gun safety bill हा बहुप्रतिक्षित विधेयकाचा करार केला आहे.