Video: महाराष्ट्रात जन्मलेला मराठी माणूस हा कोणतेही काम करण्यास आता मागे राहिला नाही. जगभरात नावं कमावण्यासाठी धडपड करत आहे. सद्या सोशल मीडियावर एका मराठी जोडप्यांचे कौतुक केले जात आहे. या जोडप्यांनी भारतात नव्हे तर अमेरिकेसारख्या शहरात शेती फुलवली आहे. त्यांची हा शेतीचा व्हिडिओ पाहून जगभरात कौतुक होत आहे. (हेही वाचा- ध्रुवीय अस्वलाचा हा मजेदार व्हिडिओ होत आहे मोठ्या प्रमाणात व्हायरल)
हे जोडपे मुळ महाराष्ट्रातील पुणे शहरातील रहिवासी आहे. त्यांनी अमेरिकेतील अटलांटा शेती फुलवली आहे. या शेतीचे नाव पाटील- कुलकर्णी फार्म असं नाव देण्यात आले आहे. दोघे जण अमेरिकेत आयटी इंजिनीअर म्हणून काम करतात आणि शेतीही करतात. शेतीसोबत त्यांनी बैल, घोडा, शेळी, गाढव असं पाळीव प्राणी पाळले आहे. व्हिडिओत त्यांची सेवा करत असल्याचे दिसत आहे. ही शेत केमिकल फ्री आहे असं त्यांनी व्हिडिओत सांगितले आहे.
पाहा व्हिडिओ
Viral | This Maharashtrian couple has established Patil Kulkarni Farm in Atlanta, USA pic.twitter.com/irimGqzzx7
— MUMBAI NEWS (@Mumbaikhabar9) August 4, 2024
ऐवढंच नाही तर शेतात एक चुल बांधली आहे. चुलीवरच्या भाकरीचा आस्वाद या फार्ममध्ये घेता येतो. त्यानंतर शेतात भाज्या, फळभाज्या पिकवले जातात. शेतात पिकवलेल्या वेगवेगळ्या भाज्या व्हिडिओत दिसत आहे. पर्यटकांसाठी त्यांनी निर्सगाच्या सानिध्यात राहण्याची सोय केली आहे. अमेरिकेसारख्या देशात जाऊन आपली भारतीय संस्कृती टिकवणे ही सोपी गोष्ट नाही. ते या जोडप्यांनी करून दाखवले आहे. याबद्दल नेटकरी त्यांचे कौतुक करत आहे.